व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मंत्री माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ; मावळात शिवसेना उबाठा पक्षाची मागणी

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 29, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Remove Ministers Manikrao Kokate Yogesh Kadam from cabinet Shiv Sena UBT Party demands in Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विरोधक या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वारंवार शेतकर्‍यांबाबत असंसदीय भाषा वापरली असून विधानसभेत ते रमीचा खेळ खेळताना एका व्हिडिओतून दिसून आले. शासन भिकारी असल्याचे कोकाटे यांनी म्हटले. तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे डान्सबार चालवितात असा आरोप होत आहे. अशा व्यक्ती मंत्री म्हणून राहण्यास पात्र नसून मंत्री कदम व कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, तसेच मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मावळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. याप्रसंगी पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, भोसरी विधानसभा संघटक भारतदादा ठाकूर, मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, युवासेना तालुका अधिकारी उमेश गावडे, तालुका सल्लागार मारुतीभाऊ खोले, रमेश जाधव, शांताराम भोते, समन्वयक रवींद्र गायकवाड, बाळासाहेब शिंदे, वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते, देहूरोड शहरप्रमुख संदीप बालघरे, विभागप्रमुख उमेश दहीभाते, भरत भोते, उपविभागप्रमुख भरत वाटाणे, राहुल दवणे, शाखाप्रमुख गोपीनाथ चोरगे, शंकर दळवी, धीरज घारे, संदीप ढोरे, रामभाऊ कोकरे, यशवंत बोडके आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यातील शेतकर्‍यांबद्दल असंसदीय भाषा वापर करणे, पंचनाम्यासाठी अरेरावीची भाषा करणे, अधिवेशन सुरू असताना चक्क सभागृहात मोबाईलवर रमी खेळणे, वारंवार बेजबाबदार वक्तव्ये करणे, यामुळे शेतकरी व महाराष्ट्राची बदनामी होत आहे. कोकाटे यांच्या या अशोभनीय कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे. अशी बेजबाबदार व अहंकारी व्यक्ती राज्याच्या मंत्रिपदावर राहण्यास पात्र नाही. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी माणिकराव कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने डान्सबार चालतो, अशा वादग्रस्त मंत्र्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी याबाबत राज्य सरकारने दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मावळ तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश आणि चावी वाटपाचा भव्य सोहळा संपन्न । Maval News
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट
– पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव-चाकण-उरुळी हे दोन रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार
– श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरात मोरया प्रतिष्ठान मार्फत सलग तीन महिने नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर । Vadgaon Maval

Next Post

नाशिक फाटा ते खेड, हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या तिन्ही महामार्गांचे रुंदीकरण करावे ; अजित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ajit Pawar letter to Nitin Gadkari

नाशिक फाटा ते खेड, हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या तिन्ही महामार्गांचे रुंदीकरण करावे ; अजित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.