व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रवाशांनो, काळजी घ्या! मृत्यू असाही येऊ शकतो… मंगलकार्याला निघाला पण त्याचाच अंत्यविधी झाला !

फक्त वाहन चालवतानाच नाही तर वाहनात बसताना, वाहनातून उतरतानाही आपण सावध राहणे आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. अन्यथा मृत्यू कुठेही आणि कसाही येऊ शकतो, हे आपल्याला या घटनेतून दिसून येते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 10, 2022
in महाराष्ट्र, देश-विदेश, व्हिडिओ
Accident-Man-Died

Photo Courtesy : Gurunath Sathelkar


पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणारा रस्ता म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग . या मार्गावरुन दररोज लाखो गाड्या ये-जा करतात. या वाहनांची जणू वेगाशी-वाऱ्याशी स्पर्धा सुरूये असं वाटावं, इतका वेग असतो. यातूनच अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात, ज्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. द्रुतगती मार्गावर होणारे अपघात आणि त्यातून जाणारे जीव यांची कारणमीमांसा केल्यास नेहमी दोन वाहनांची धडक, गाडीला आग लागणे, गाडी दरीत कोसळणे किंवा पलटी होणे अशी कारणे समोर येतात. मात्र, शुक्रवारी (9 डिसेंबर) रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेला अपघात हा सर्वांना सावध करणारा आहे. ( Person On His Way To Wedding Program Died In Accident On Mumbai Pune Expressway )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मृत्यू असाही येऊ शकतो…

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईकडून पुण्याकडे शुक्रवारी हॉटेल नोवोटेल (ॲड लॅब इमॅजिका) खालापूर इथे लग्न समारंभासाठी मिनीबसमधून प्रवासी निघाले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खालापूर टोलनाक्याजवळ बस आली असता त्यातील प्रवासी शैलेश तावडे ( वय 40, रा.जोगेश्वरी, मुंबई) हे लघुशंकेसाठी बसमधून उतरले आणि स्वच्छतागृहाच्या दिशेने जात होते. मात्र, त्यावेळीच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. धडकेमुळे शैलेश खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात सर्वांनाच धडा शिकवणारा आहे. फक्त वाहन चालवतानाच नाही तर वाहनात बसताना, वाहनातून उतरतानाही आपण सावध राहणे आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. अन्यथा मृत्यू कुठेही आणि कसाही येऊ शकतो, हे आपल्याला या घटनेतून दिसून येते.

अधिक वाचा –

– नातलग चिमुरडीवर बला’त्कार करणाऱ्या नराधमाला वडगाव मावळ पोलिसांकडून अटक; 13 डिसेंबरपर्यंत कोठडी
– स्व. दिगंबर भेगडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वडगावमध्ये रविवारी सर्वपक्षीय शोकसभा


dainik maval jahirat

Previous Post

स्व. दिगंबर भेगडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वडगावमध्ये रविवारी सर्वपक्षीय शोकसभा

Next Post

दुःखद! ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sulochana-Chavan

दुःखद! ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers Loan Waiver Scheme Details borrowers uploaded by PDCC

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ : ‘पीडीसीसी’कडून १.०८ लाख कर्जदारांचा तपशील अपलोड

July 1, 2026
High-level inspection of Dehu-Alandi Palkhi route ahead of Ashadhi Wari 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी

July 1, 2026
Ketan Agrawal Murder Case Police custody of Siya Goyal Chetan Chaudhary extended until July 3

केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

July 1, 2026
Farmers rise up again against Pavana closed-conduit pipeline project protest on Wednesday

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

July 1, 2026
Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.