व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती । Pawana Dam News

पिंपरी-चिंचवडसह मावळवासींयाची तहान भागविणारे पवना धरण ९५ टक्के भरले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 16, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
MP Shrirang Barne performs water puja for Pawanamai Pawana Dam News

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवडसह मावळवासींयाची तहान भागविणारे पवना धरण ९५ टक्के भरले आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज (शनिवारी) जलपूजन करण्यात आले. वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणात असून शहरवासीयांची वर्षेभराची पाण्याची चिंता मिटली आहे. धरणातील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमता वाढल्याचे खासदार बारणे म्हणाले.

यावेळी पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, संत तुकाराम सहकार साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव, कांता रसाळ, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, उपतालुका प्रमुख राम सावंत, चंद्रकांत भोते, धनंजय नवघने, अमित कुंभार, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सुदर्शन देसले, तळेगाव शिवसेना शहर प्रमुख देव खरटमल, नवनाथ हरपुडे, प्रवीण ढोरे, मदन शेडगे व मोठ्या संख्येने ग्रामस्त उपस्थित होते.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. ६ एमएलडीपेक्षा अधिकचे पाणी शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाते. शहराचा पाणी पुरवठ्याचे पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. धरणातील पाण्याची क्षमता वाढण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून खासदार श्रीरंग बारणे यांच्यावतीने धरणातील गाळ काढला जातो. त्यामुळे धरणातील साठवण क्षमता वाढली. गाळ काढल्यामुळे पाणीसाठा अधिकचा राहत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकरांवरील पाणीसंकट टळले. काही वर्षांपूर्वी दोन दिवसाआड पाणी मिळत होते. परंतु, गाळ काढल्यामुळे धरणातील साठवण क्षमता वाढली असून शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नाही.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ” मागील आठ वर्षांपासून धरणातील ८५ हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता वाढली आहे. पवना धरणात ९५ टक्के पाणीसाठा आहे. वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणात आहे. पवना नदी सुधार प्रकल्प राबविण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. पीएमआरडीए आणि पिंपरी-चिंचवड महापालिका नदी सुधार प्रकल्प राबविणार आहे.नदी स्वच्छ रहावी, नदी काठच्या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे नदी पात्रात अशुद्ध पाणी जाणार नाही. नागरिकांना आणखी शुद्ध पाणी मिळेल. महापालिकेचा पाणी शुद्धीकरण करण्याचा खर्च कमी होईल.””

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव फाटा येथील वाहतूक कोंडीवर उपाय योजण्याची गरज ! कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
– पुणे – लोणावळा लोकल : कोरोना काळात बंद झालेली दुपारची लोकल सेवा पुन्हा सुरू करावी
– फुलांना शेतमाल नियमानाखाली आणून खरेदी विक्री बाजारपेठेसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त जागा उपलब्ध करुन द्यावी
– तुमच्याही जुन्या वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नाहीये? मग ही बातमी नक्की वाचा, शासनाचा दिलासादायक निर्णय


Previous Post

हर घर तिरंगा… हर घर स्वच्छता… अभियान अंतर्गत वडगाव नगरपंचायतीने राबविले विविध उपक्रम । Vadgaon Maval

Next Post

रोजगार हमी योजना समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांचा यवतमाळ जिल्हा दौरा ; कळंब तालुक्यातील अनियमिततेची चौकशी होणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Employment Guarantee Scheme Committee Head MLA Sunil Shelke visits Yavatmal district

रोजगार हमी योजना समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांचा यवतमाळ जिल्हा दौरा ; कळंब तालुक्यातील अनियमिततेची चौकशी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.