व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रशांत दादा भागवत आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न । Prashant Bhagwat

सारिकाताई सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 8, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
प्रशांत दादा भागवत आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न । Prashant Bhagwat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील युवा नेतृत्व प्रशांत दादा भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. ७ सप्टेंबर) रोजी जांभुळफाटा येथील शिवराज पॅलेस येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा सोहळा पार पडला. यावेळी महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणाात होती.

आमदार सुनील शेळके यांच्या पत्नी, कुस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. यात गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना हेलिकॉप्टर राईड, गोल्ड प्लेटेड गणेश मूर्ती, स्मार्टफोन, फ्रीज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, फूड प्रोसेसर, गॅस शेगडी, कुलर, मिक्सर, टेबल फॅन व इस्त्री अशी विविध आकर्षक बक्षिसे स्पर्धकांना देण्यात आली.

यावेळी कुलस्वामिनी महिला मंच मावळ तालुका संस्थापिका अध्यक्षा सारिका ताई सुनील आण्णा शेळके यांसह राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा वर्षा नवघणे, विविध गावांतील सरपंच-माजी सरपंच, महिला नेत्या व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आरजे अक्षयच्या धमाल सूत्रसंचालनाने कार्यक्रमात जोश निर्माण झाला. लहान मुलांनी व महिलांनी दिलेल्या नृत्य सादरीकरणाने वातावरण भारावले.

यावेळी महिलांनी गणरायाला प्रार्थना केली की “प्रशांत दादा भागवत यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत.” यावेळी प्रशांत भागवत यांच्या कार्याला देखील उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमात स्पर्धकांना मिळालेले बक्षिसे पुढील प्रमाणे ; ( क्रमांक – सजावट – गावाचे नाव – बक्षिस)

1. विद्या अरूण काशिद – पहिला (अ) – ज्ञानेश्वर महाराज – इंदोरी – फ्रीज
2. श्लोक महिंद्र वाळुंज – पहिला (ब) – ऑपरेशन सिंदूर – इंदोरी – फ्रीज
3. अनिकेत आत्माराम शिंदे – दुसरा (अ) – वारी दिवे घाट – राजपुरी – पिठाची गिरणी
4. विद्या विकास दगडे दुसरा (ब) वाप्पाची शाळा इंदोरी पिठाची गिरणी
5. नंदा वाळासाहेब झोळ तिसरा (अ) वटसावित्री वराळे वॉशिंग मशीन
6. युगांधर प्रविण वारिंगे तिसरा (ब) शिवालय वारंगवाडी वॉशिंग मशीन
7. संदेश सिताराम शिंदे चौथा (अ) जेजुरी ब्राम्हणवाडी फूड प्रोसेसर
8. गितल नितीन कारके चौथा (व) पंढरपूर दर्शन आंवी फूड प्रोसेसर
9. हर्षदा/श्रद्धा/काजल उडापे पाचवा (अ) कोळी वधलवाडी स्मार्ट फोन
10. मिनल हरिओम आगळमे पाचवा (ब) स्वयंपाक घर साते स्मार्ट फोन
11. हर्षवर्धन आकाश नाटक सहावा (अ) केदारनाथ जांबवडे गॅस शेगडी
12. मयुर अरूण शिंदे सहावा (ब) इंदोरी गाव इंदोरी गॅस शेगडी
13. शंकर तानाजी मोहिते सातवा (अ) नवनाथ सेवेकरी मोहितेवाडी कुलर
14. काजल अनिल पाटील सातवा (ब) स्वामी समर्थ सुदवडी कुलर
15. प्रतिक्षा महेश आल्हाट आठवा (अ) पाईवारी माळवाडी मिक्सर
16. योगिता संदिप काळे आठवा (ब) तुळजाभवानी प्रवेशव्दार नाणोली मिक्सर
17. मयुरी मारुती उडापे नववा (अ) तुकाराम महाराज पालखी बधलवाडी टेबल फॅन
18. किरण योगेश मराठे नववा (ब) राजा पंठरीचा वराळे टेबल फॅन
19. विशाखा संकेत तोडकर दहावा (अ) तुळजाभवानी सांगवी इस्त्री
20. मोनिका जांभुळकर दहावा (ब) प्रवेशव्दार जांभुळ इस्त्री
21. प्रमिला संजय गाडे दहावा (क) पाईवारी

यासह आयोजकांकडून दोन विशेष बक्षिसे देण्यात आली.यामध्ये शैला अनुराग मराठे यांनी प्रशांत दादा भागवत यांच्या मार्फत महिलांसाठी हेलिकॉप्टर राईड आयोजित करण्यात आली होती,त्याचा विशेष देखावा बनविला होता. त्याबद्दल शैला अनुराग मराठे यांना विशेष उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले गोल्ड प्लेटेड गणेश मूर्ती त्यांना भेट म्हणून देण्यात आली. यासह आणखीन एक उत्तेजनार्थ बक्षीस प्रेरणा रवींद्र वाघ यांना देण्यात आले. देखाव्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक व्ह्यूज मिळाल्याबद्दल प्रेरणा वाघ यांना गौरविण्यात आले. त्यांच्या देखाव्याच्या व्हिडिओला इंस्टाग्राम वर 25 हजार 500 व्ह्यूज आणि 1000 लाईक मिळाले.

याप्रसंगी इंदोरी गाव लोकनियुक्त सरपंच शशिकांत शिंदे, माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, विठ्ठल मोहिते, अनिल मोहिते, माळवाडी विद्यमान सरपंच पल्लवी दाभाडे, बेबीताई बैकर, ग्रामीण ब्लॉक माजी अध्यक्षा पुष्पाताई घोजगे, जयश्री सावंत (ग्रा. सदस्य), अलकाताई शिंदे, मंदा ढोरे, माजी उपसरपंच सोनलताई सूर्यवंशी, रा. कॅा. अध्यक्षा इंदोरी राजश्री राऊत, माधुरी गाडे (रा. कॅा. अध्यक्षा सुदुंबरे), छाया सावंत (रा. कॅा. अध्यक्षा गोडुंब्रे), नेहा बधाले (रा. कॅा. अध्यक्षा बधलवाडी ), दीपिका भेगडे, साधना उडापे, उपसरपंच आम्रपाली मोरे, पल्लवी मराठे, रा. कॅा. उपअध्यक्षा मनीषा दाभाडे, पुनम शिंदे (रा. कॅा. अध्यक्षा राजापुरी), तृप्ती जांभूळकर, जयश्री लंके, प्रियांका चव्हाण, सीताबाई वाघमारे, धनश्री काशिद (ग्रा. सदस्य), अंकिता ढोरे (रा. कॅा. उपअध्यक्षा इंदोरी), अक्षदा शिंदे (रा. कॅा. युवती अध्यक्षा इंदोरी), मा. उपसरपंच विद्या मोहिते, रा. कॅा. अध्यक्षा वराळे अनिता मराठे, रा. कॅा. अध्यक्षा मिंडेवाडी सुवर्णा बधाले, रा. कॅा. अध्यक्षा नाणोली संगीता जगताप, अश्विनी भोसलकर, किरण शिंदे (सरचिटणीस), दत्तात्रय ढोरे, विनोद वाघुले, संकेत शिंदे, निलेश शेवकर, संतोष मराठे, भानुदास शिंदे, संतोष वंजारी, विनोद भागवत (मा. ग्रा. सदस्य), विनोद शिंदे, सतीश शेवकर, बालाजी ग्रुपचे सर्व सदस्य व सर्व सहभागी स्पर्धक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत यांनी आपल्या मनोगतात प्रशांत भागवत यांच्या नेतृत्वाचे कौतूक करून त्या आमदार सुनील शेळके यांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमन करीत असल्याबद्दल सांगितले. तर इंदोरी गावचे सरपंच शशिकांत शिंदे यांनी प्रशांत भागवत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे कौतूक करीत त्यांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सारिका ताई सुनील शेळके यांनी प्रशांत भागवत यांनी महिला वर्गासाठी राबविलेल्या उपक्रमाचे कौतूक करीत तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. यासह आमदार सुनील आण्णांचा आशीर्वाद नेहमी सोबत राहिल असेही सांगितले.

आभार प्रदर्शन करताना, प्रशांत दादा भागवत यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि महिला भगिनी, पुरुषांचे आभार मानले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना सहभागाबद्दल धन्यवाद दिले. तसेच, मावळचे जनसेवक आमदार सुनील शेळके यांना आपण पांडुरंग मानतो, त्यांच्या फक्त पायची वीट होण्याचे काम आपण करीत आहोत, हे सांगताना जनसेवेचा हा वारसा पुढे नेणार असल्याचे सांगितले.

प्रशांत दादा भागवत हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असून, त्यांच्या पुढाकाराने झालेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम ठरला. अखेर सुग्रास जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– कौतुकास्पद ! डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या कडून लोणावळा येथे निर्माल्य संकलन अभियान । Lonavala News
– आदिवासी विकासाला गती देण्यासाठी ‘आदी कर्मयोगी’ अभियान ; जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील एक केंद्रप्रमुख व दोन शिक्षकांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर । Maval News

Next Post

अजिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष भिकोले यांचे आकस्मित निधन । Santosh Bhikole Passes Away

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Former Deputy Sarpanch of Ajivali Group Gram Panchayat Santosh Bhikole passes away

अजिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष भिकोले यांचे आकस्मित निधन । Santosh Bhikole Passes Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.