व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न

या बैठकीत नागरिकांच्या न्यायप्रवेशासाठी दीर्घकाळापासूनची उणीव भासत असलेल्या भव्य न्यायालयीन वास्तू उभारणीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 11, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Decision to construct grand building for Vadgaon Maval Court from approved fund of Rs 109 crore

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्णपान कोरणारा महत्वाचा टप्पा वडगाव मावळ येथे नोंदवला गेला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, वडगाव मावळ येथे न्यायमूर्ती, वरिष्ठ वकील व बार असोसिएशन यांची संयुक्त बैठक आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या बैठकीत नागरिकांच्या न्यायप्रवेशासाठी दीर्घकाळापासूनची उणीव भासत असलेल्या भव्य न्यायालयीन वास्तू उभारणीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. कृषी विभागाच्या जागेवर उभारण्यात येणारी ही इमारत पुढील ५० वर्षांचा विचार करून आधुनिक व अत्याधुनिक सुविधांसह बांधली जाणार आहे.

या भव्य इमारतीमुळे वडगाव मावळ व परिसरातील नागरिकांना त्वरित, सुलभ व पारदर्शक न्याय मिळविण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्बल घटकांनाही न्याय मिळविण्यात आत्मविश्वास निर्माण होईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

न्यायालयीन कामकाजात कार्यक्षमता वाढविणे, वकिलांना योग्य सुविधा उपलब्ध करणे आणि सर्वसामान्यांना न्यायालयीन वातावरणात सहज प्रवेश मिळावा हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सदर बैठकीस न्यायमूर्ती डी. के. अनभुले, आर. व्ही. हुद्दार, एस. बी. काळे, एस. एस. देशमुख, एस. जी. दुबाळे, ए. एम. विभूते, एस. पी. जाधव, व्ही. आर. डोईफोडे, एस. ए. माळी, के. ए. देशपांडे तसेच ज्येष्ठ वकील व वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रतापराव शेलार, लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. श्रीमती रंजनाताई भोसले यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासोबतच सामाजिक न्यायप्रणाली सक्षम करण्यासाठी आमदार सुनील शेळके सतत प्रयत्नशील आहेत. न्यायालयीन इमारतीच्या उभारणीचा निर्णय हा त्यांच्या दूरदृष्टीचा व समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा ठोस पुरावा ठरतो. त्यांच्या पुढाकारामुळे न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक निधी, सुविधा व नियोजन योग्य पद्धतीने पार पडेल, अशी खात्री यावेळी व्यक्त करण्यात आली.

या निमित्ताने वडगाव मावळ न्यायालयाला भविष्यातील न्यायनगरी बनविण्याचा मार्ग खुला झाला आहे. या बैठकीत घेतलेला निर्णय मावळ तालुक्याच्या न्यायनगरीसाठीच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी ऐतिहासिक व दूरगामी परिणाम घडवणारा ठरणार आहे. न्यायाच्या दारी प्रत्येक नागरिक सहज पोहोचेल, अशी नवी दृष्टी या उपक्रमातून साकार होणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ; राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे आवाहन
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित


dainik maval jahirat

Previous Post

गांजा बाळगल्याप्रकरणी युवकाला अटक, कामशेत पोलिसांची कारवाई । Kamshet Crime

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोच्या धडकेत चहा विक्रेत्याचा मृत्यू । Mumbai Pune Expressway

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोच्या धडकेत चहा विक्रेत्याचा मृत्यू । Mumbai Pune Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.