व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जीएसटी सवलतीनंतर टाटाची मोठी घोषणा ! कारच्या किमती तब्बल १.५५ लाख रुपयांपर्यंत कमी केल्या, पाहा तुमच्या बजेटमधील कार

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी सुधारणा) स्लॅबमध्ये मोठे बदल केल्यानंतर, देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने अधिकृतपणे त्यांच्या कारच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 11, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र
Tata big announcement after GST relief Car prices reduced up to Rs 1 lakh see your budget cars

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अलीकडेच जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत १२०० सीसी पर्यंत पेट्रोल इंजिन, १५०० सीसी पर्यंत डिझेल इंजिन आणि ४ मीटरपेक्षा कमी लांबी असलेल्या कारवर १८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, टाटा मोटर्सने त्यांच्या संपूर्ण वाहन श्रेणीतील कारच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी सुधारणा) स्लॅबमध्ये मोठे बदल केल्यानंतर, देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने अधिकृतपणे त्यांच्या कारच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली.

टाटा मोटर्सने त्यांच्या सर्वात स्वस्त कार टाटा टियागोपासून ते प्रसिद्ध एसयूव्ही टाटा सफारीपर्यंत सर्व वाहनांच्या किमतीत बदल केले आहेत. कारच्या किमतीतील ही कपात २२ सप्टेंबर २०२५ पासून देशभरातील डीलरशिपवर लागू होईल.

कार आणि कमी झालेली किंमत :
टाटा कारचे मॉडेल – कमी झालेली किंमत (रुपयात)
टियागो – 75,000 रु.
टिगोर – 80,000 रु.
अल्ट्रोज – 1,10,000 रु.
पंच – 85,000 रु.
नेक्सॉन – 1,55,000 रु.
कर्व्ह – 65,000 रु.
हॅरियर – 1,40,000 रु.
सफारी – 1,45,000 रु.
(टीप – कमी झालेली किंमत सह कारच्या संपूर्ण किमतीसाठी जवळील डिलरसोबत संपर्क साधा)

टाटा मोटर्स चे मावळ तालुक्यातील अधिकृत डिलर असलेले पंचजन्य ऑटोमोबाईल च्या मॅनेजर स्नेहल काळे यांनीही ‘टाटा’ कंपनीकडून ग्राहकांना दिलेल्या या खास गिफ्टचे स्वागत केले आहे. तसेच मावळ तालुक्यातील ग्राहकांना जीएसटी सवलतीसह टाटाची कार खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथे पंचजन्य ऑटोमोबाईल हे टाटा मोटर्सचे अधिकृत शोरूम असून येथे जीएसटी सवलतीसह कार खरेदी करता येणार आहे.

सणासुदीच्या काळात ग्राहकांना होणार फायदा :
टाटा मोटर्सने ही घोषणा भारतात लवकरच सुरू होणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या अगदीच आधी केली आहे, जो पारंपारिकपणे वाहन विक्रीचा सर्वोच्च काळ मानला जातो. अपेक्षित वाढत्या मागणीमुळे कंपनीने ग्राहकांना आगाऊ बुकिंग करण्याचा सल्ला दिला आहे.

जीएसटीमध्ये कपात टाटा मोटर्सच्या संपूर्ण प्रवासी वाहन श्रेणीवर लागू होईल. यामध्ये, ग्राहकांना एंट्री-लेव्हल हॅचबॅक टियागोवर जास्तीत जास्त ७५,००० रुपयांची बचत मिळेल. त्याचप्रमाणे, टिगोरवर जास्तीत जास्त ८०,००० रुपयांची आणि लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही पंचवर ८५,००० रुपयांची सवलत मिळेल. त्याच वेळी, सर्वात मोठी कपात नेक्सॉनमध्ये दिसून आली आहे, ज्याची किंमत १.५५ लाख रुपयांनी कमी झाली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न
– गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित


dainik maval jahirat

Previous Post

जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरील कामशेत खिंडीत व्यावसायिकाला अडवून लुटले । Kamshet News

Next Post

ग्लास स्काय वॉक प्रकल्पाला गती, अजित पवारांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे सादरीकरण, घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय । Lonavala Glass Sky Walk Project

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Glass Sky Walk project gains momentum project presentation in presence of Ajit Pawar important decisions taken

ग्लास स्काय वॉक प्रकल्पाला गती, अजित पवारांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे सादरीकरण, घेतले 'हे' महत्वाचे निर्णय । Lonavala Glass Sky Walk Project

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.