व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्लास स्काय वॉक प्रकल्पाला गती, अजित पवारांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे सादरीकरण, घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय । Lonavala Glass Sky Walk Project

मावळ तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 12, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Glass Sky Walk project gains momentum project presentation in presence of Ajit Pawar important decisions taken

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे मावळ तालुक्यातील लोणावळा ( कुरवंडे, ता. मावळ ) जवळील लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्काय वॉक प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये ग्लास स्काय वॉक प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

अजित पवार यांच्या माध्यमातून नियोजन विभागाकडून ५ फेब्रुवारी २०२४ रोजी या प्रकल्पासाठी ३३३ कोटींची मान्यता दिली आहे. या बैठकीत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात प्राथमिक समन्वय, प्रस्तावित सुविधा, जागेची आवश्यकता, स्कायवॉकचे महत्त्व, अ‍ॅडव्हेंचर व अम्युझमेंट पार्क, पर्यटकांची सुरक्षा व निवास याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रकल्पामधील प्रस्तावित अंतर्भुत सुविधा :
1. भव्य प्रवेशद्वार, तिकीट घर, फूड कोर्ट, स्नॅक बार, वाहनतळ, कनिष्ठ समारंभ हॉल यांसारख्या सोयी. सायटसीईंग, झिप लाईन, बंजीजंपिंग, वॉल क्लायम्बिंग, फेरीस व्हील यांसारखे साहसी खेळ.
2. झुला, रेन डान्स, स्केटिंग, पाण्याची टाकी, CCTV कॅमेरे, ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना इत्यादी सुविधाचा समावेश आहे.

बैठकीत घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय :
1. जागेची आवश्यकता : उपलब्ध जागेची कमतरता लक्षात घेऊन वनविभागाने अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी.
2. स्कायवॉकचे महत्त्व : स्थानिकांना स्कायवॉकचा अनुभव यावा यासाठी दरमहा ध्वजवंदन सोहळा आयोजित करण्यात येईल.
3. अ‍ॅडव्हेंचर व अम्युझमेंट पार्क सोबत आणखी नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करून पर्यटन सुविधा वाढवण्याबाबत दिले निर्देश
4. पर्यटकांची सुरक्षा व निवास: पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेवर भर. निवासासाठी टेंटिंग सुविधा उभारण्याचा निर्णय
5. मावळ तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

सदर बैठकीस आमदार सुनील शेळके यांच्या समवेत राजेश देशमुख (उपमुख्यमंत्री यांचे सचिव), रमेश जालनापुर (माजी अध्यक्ष – रामोजी फिल्म सिटी), जितेंद्र डूडी (जिल्हाधिकारी – पुणे V.C. वर), योगेश म्हसे (आयुक्त – PMRDA – V.C. वर), मंगेश वानखेडे (मु. का. अ. गार्डियन मीडिया) तसेच मावळ तालुक्यातील गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, साहेबराव कारके, दिपक हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न
– गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित


dainik maval jahirat

Previous Post

जीएसटी सवलतीनंतर टाटाची मोठी घोषणा ! कारच्या किमती तब्बल १.५५ लाख रुपयांपर्यंत कमी केल्या, पाहा तुमच्या बजेटमधील कार

Next Post

देहूरोडच्या ऑर्डनन्स फॅक्टरी, डिफेन्स विभागातील निगमीकरणाचा विरोध ; ‘संयुक्त कारवाई समिती’ची संपाची हाक । Dehu Road

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Opposition to corporatization of Dehu Road Ordnance Factory Defense Department

देहूरोडच्या ऑर्डनन्स फॅक्टरी, डिफेन्स विभागातील निगमीकरणाचा विरोध ; ‘संयुक्त कारवाई समिती’ची संपाची हाक । Dehu Road

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.