व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk

या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, सोबत पवना धरण परिसरातील गावांचाही विकास होईल

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 13, 2025
in लोकल
special meeting regarding Lonavala Glass Sky Walk project was held at Collectorate office Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गुरुवारी (दि. ११) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेतेखाली मंत्रालयात संपन्न झालेल्या बैठकीनंतर लोणावळा ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत शुक्रवारी (दि. १२) पुणे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातही विशेष महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीत लोणावळा ग्लास स्काय वॉक प्रकल्पासंदर्भातील विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या जागेचा तांत्रिक आढावा घेण्यात आला. विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित असलेल्या प्लॅननुसार जागांची पडताळणी करण्यात आली. पर्यायी कनेक्टिव्हिटी रस्त्यांची आखणी व त्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर विचार विनिमय करण्यात आला.

स्थानिकांना पर्यटनवाढीमुळे रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली. बैठकीदरम्यान पर्यटनक्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक उद्योजक व तरुणांना संधी देणे, तसेच दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी शासनस्तरावर आवश्यक प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रकल्पामधून स्थानिकांना रोजगार, व्यवसाय व उद्योगधंद्यांच्या संधी निर्माण होणार असून, याभागासोबतच पवना धरण परिसरातील गावांचाही विकास वेगाने होईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार सुनील शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ग्लास स्काय वॉक प्रकल्प :
लोणावळा जवळील कुरवंडे येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी प्रस्तावीत ग्लास स्काय वॉक प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसेच या प्रकल्पासाठी ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच ३३३ कोटी रुपयांची मान्यता मिळाली असून, पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मावळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प असल्याने मावळ तालुक्याच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न
– गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित


Previous Post

अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी

Next Post

शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांची दूरवस्था, नागरिकांच्या विविध अडचणींबाबत भाजपा सोशल मीडिया सेलचे प्रशासनाला निवेदन । Maval BJP

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
BJP Social Media Cell statement to administration regarding farmers issues in Maval Taluka

शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांची दूरवस्था, नागरिकांच्या विविध अडचणींबाबत भाजपा सोशल मीडिया सेलचे प्रशासनाला निवेदन । Maval BJP

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.