व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळ : शिळींब विकास सोसायटीच्या चेअरमनपदी शहाजी शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी अंकूश चोरघे यांची निवड

शिळींब विकास सोसायटीच्या चेअरमनपदी शहाजी शिंदे यांची बिनविरोध निवड !

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 19, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Shahaji Shinde elected as Chairman of Shilimb Vikas Society Pavan Maval News

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवन मावळ विभागातील सहकार क्षेत्रातील प्रमुख सहकारी संस्था असलेल्या शिळींब विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज (शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर) रोजी पार पडली. महादेव मंदिर, गावठाण (शिळींब) येथे पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत सोसायटीच्या चेअरमनपदी शहाजी आनंदराव शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी अंकूश चिंधू चोरघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच यावेळी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालक पदी संदीप मारूती शिंदे यांची निवड करण्यात आली.

शिळींब विकास सोसायटीचे सचिव रामदास पाठारे यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तर मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रुस्तुम-ए-हिंद पै. अमोल बुचडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा पार पडली. याप्रसंगी सोसायटीचे संचालक मंडळ सुरेश शं. जगताप, जालींदर ब. ढमाले, मधूकर म. केदारी, अविनाश शि. शिंदे, निवृत्ती ल. कडू, शाम रा. चोरघे, प्रकाश रा. धनवे, अनिता अं. धनवे, बायडाबाई अ. ढमाले, बबन बा. आखाडे, भाऊ चिं. शिंदे, भगवान ना. दरेकर (तज्ज्ञ संचालक) हे उपस्थित होते.

शिळींब विकास सोसायटीचे मावळते चेअरमन प्रकाश धनवे व व्हाईस चेअरमन निवृत्ती धनवे यांनी आपल्या पदाचा ठरविलेला कार्यकाल पूर्ण होताच राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी विहित मुदतेत चेअरमनपदासाठी शहाजी शिंदे व व्हाईस चेअरमन पदासाठी अंकूश चोरघे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पूर्ण होताच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. शिळींब सोसायटीची निवडणूक मे २०२२ रोजी झाली असून सध्या अस्तित्वात असलेल्या सदस्य कार्यकारिणीचा कार्यकाल मे २०२७ पर्यंत असणार आहे.

याप्रसंगी चंद्रकांत शिंदे, विलास मालपोटे, नामदेव शेलार, ज्ञानेश्वर निंबळे, नामदेव ठुले, किसनराव धनवे, धिरज गरवड, अंकूश धनवे, दत्ता कडू, शहाजी कडू, संदीप ढमाले, बाजीराव ढमाले, नामदेव शिंदे, पांडुरंग मारणे, संदीप शिंदे, भाऊ आखाडे, शाम चोरघे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत, सभेचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन जालिंदर ढमाले यांनी केले.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित चेअरमन शहाजी शिंदे यांनी, सर्व कार्यकारिणीला सोबत घेऊन सोसायटीच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करणार असून सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडे, आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिळींब सोसायटीचे कामकाज आदर्शवत राहील असे काम करणार असल्याचे सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News


Previous Post

‘गटबाजी करु नका, सर्वांना विश्वासात घेऊन काम करा’ ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सूचना

Next Post

व्हिडिओ : पवनानगर चौकात जीवघेणे खड्डे ; प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष, एखाद्याचा जीव गेल्यावरच जाग येणार का? स्थानिक नेत्यांंचेही दुर्लक्ष

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Video potholes in Pawananagar Chowk Administration complete neglect Local leaders neglect too

व्हिडिओ : पवनानगर चौकात जीवघेणे खड्डे ; प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष, एखाद्याचा जीव गेल्यावरच जाग येणार का? स्थानिक नेत्यांंचेही दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.