व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किवळे-रावेत-डांगे चौक-काळेवाडी मार्गासाठी मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार निगडी ते भक्ती शक्ती चौकापर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या विस्ताराचे काम सुरू झाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 5, 2025
in ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
Prepare DPR for Metro for Kivale-Ravet-Dange Chowk-Kalevadi route MP Shrirang Barne letter to Union Ministers

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विस्तारणे गरजेचे आहे. त्यासाठी किवळे- रावेत – डांगे चौक – काळेवाडी – जगताप डेअरी ते चतुर्श्रुंगी असा नवीन मेट्रो मार्ग तयार करावा. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपी) तयार करावा, अशी मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची दिल्लीत भेट घेतली. पिंपरी-चिंचवड शहरात नवीन मेट्रो मार्गाची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याबाबतचे सविस्तर निवेदन दिले. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र हे देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरी क्षेत्रांपैकी एक आहेत. जलद शहरीकरणामुळे लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची घोषणा केली. सध्या पुण्यात विविध मार्गावर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. काही मार्गावर मेट्रो धावत आहे. त्यामुळे नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रो धावत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार निगडी ते भक्ती शक्ती चौकापर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या विस्ताराचे काम सुरू झाले आहे. हे पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. निगडीतून पुण्यापर्यंत नागरिकांना थेट मेट्रोने जाता येईल. पिंपरी-चिंचवडमधील वेगाने वाढणारी लोकसंख्या, वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेता किवळे – रावेत – डांगे चौक – काळेवाडी – जगताप डेअरी व सध्याच्या चतुर्श्रुंगी मेट्रो मेट्रो स्टेशनपर्यंत विस्तार करण्याची आवश्यक आहे.

हा संपूर्ण मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी उद्देशांसाठी महत्त्वाचा आहे. त्यासाठी मेट्रो सेवा आवश्यक आहे. या विस्तारामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला एक नवीन चालना मिळेल. त्यामुळे या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासंबधी आवश्यक असणारी प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही सुरू करावी. हा मार्ग केल्यास पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय होईल. त्यामुळे याबाबतचा आराखडा करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात


Previous Post

कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटातील प्रभावी उमेदवार म्हणून आशाताई वायकर यांना नागरिकांचा सकारात्मक पाठींबा

Next Post

काँटे की टक्कर असलेल्या लोणावळा नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे मतदान ठरणार निर्णायक । Lonavala Nagar Parishad

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala Municipal Council General Election

काँटे की टक्कर असलेल्या लोणावळा नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे मतदान ठरणार निर्णायक । Lonavala Nagar Parishad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

PMRDA budget of Rs 4 Thousand 628 crore approved PMRD should prepare structural plan said CM Fadnavis

PMRDA च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी ; ‘पीएमआरडी’ने सहा महिन्यात संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री

May 4, 2026
electricity problem in Maval will be solved Planning for electricity supply in Maval constituency has begun

मावळमधील विजेची समस्या सुटणार ; पुढील २० वर्षात होणारी वाढ लक्षात घेऊन मावळ लोकसभा क्षेत्रात वीज पुरवठ्याचे नियोजन

May 4, 2026
Youth-Drowned

मावळमधील हृदयद्रावक घटना ! पवना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

May 4, 2026
Elderly woman seriously injured in bee attack in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी

May 4, 2026
drowning

लोणावळ्यातील बेपत्ता ‘यश’चा वलवण धरणात बुडून मृत्यू

May 4, 2026
Do not wait at Mumbai Pune missing link for photos MSRDC appeals to vehicle owners

सेल्फी, फोटो, रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते ! मिसिंग लिंक बाबत महत्वाची अपडेट

May 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.