Dainik Maval News : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ विरोधी विक्री व साठवणूक विरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसत आहे. याअंतर्गत सोमवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करीत एका महिला आरोपीस अटक करून तिच्या ताब्यातून गांजा हा अंमली पदार्थ व मुद्देमाल जप्त केला.
सोमवारी ( दि. ८) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत म.रा.वि.क. मर्यादित, सोमाटणे शाखा उपकेंद्र पेनिम्सला लँड लिमिटेड च्या जवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार किशोर विठ्ठल परदेशी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यानुसार महिला आरोपीवर एन.डी.पी.एस. अँक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला आरोपी हिच्या ताब्यात एकुण ३५ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये एकुण ६०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ आणि अन्य मुद्देमाल बेकायदेशिररित्या विक्रीकरीता कब्जात बाळगताना मिळून आला. सदर महिला आरोपीस अटक करण्यात आली असून पोउपनि चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण

