व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जमीन वापर नियमांत मोठा बदल ! ‘एनए’ अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द ; बिल्डर, जमीनधारक यांना मोठा दिलासा

राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 14, 2025
in महाराष्ट्र, मावळकट्टा
land lands image

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अकृषिक ( एनए ) परवानगीची अट रद्द केल्यानंतर आता त्याच्या पुढील ‘सनद’ घेण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक 2025’ महसूलमंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी बुधवारी विधानसभेत मांडले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधेयकाची पार्श्वभूमी मांडताना स्पष्ट केले की, १९६६ च्या जमीन महसूल संहितेमध्ये २०१४ ते २०१८ दरम्यान सुधारणा करून रहिवासी आणि वाणिज्यिक वापरासाठी ‘एनए’ (अकृषिक) परवानगीची अट यापूर्वीच शिथिल करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही ‘सनद’ घ्यावी लागत असल्याने प्रक्रियेत क्लिष्टता होती. आता ही अट पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून, त्याऐवजी नाममात्र प्रीमियम (अधिमूल्य) आकारला जाणार आहे. या बदलामुळे करात किंवा शुल्कात कोणतीही कपात होणार नाही.

असे असतील नवीन प्रीमियमचे दर (रेडीरेकनरनुसार) :
जमिनीच्या वापरासाठी आता सनदची गरज नसून खालीलप्रमाणे रेडीरेकनरच्या (बाजारमूल्य) आधारावर प्रीमियम भरून वापर नियमित करता येईल.
1. 1000 चौरस मीटरपर्यंत : रेडीरेकनरच्या 0.1 टक्का
2. 1001 ते 4000 चौरस मीटरपर्यंत : रेडीरेकनरच्या 0.25 टक्के
3. 4001 चौरस मीटर व त्यापुढील भूखंडांसाठी : रेडीरेकनरच्या 0.5 टक्के

सरकारने केलेल्या या मोठ्या बदलामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या करात किंवा शुल्कात कोणतीही कपात होणार नसून त्यांना त्यांचा वाटा मिळणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारच्या या विधेयकाचे विरोधकांनीही स्वागत केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले


Previous Post

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर ; सद्यस्थितीत यंत्रणांकडून सुरळीत वाहतुकीसाठी प्रयत्न

Next Post

विभागस्तरीय खो-खो स्पर्धेत अहिल्यानगर व सोलापूर संघाचा पराभव करीत पुणे जिल्हा संघाची राज्यस्तरीय स्पर्धेत दणक्यात एन्ट्री

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune team enters state-level tournament after defeating Ahilyanagar Solapur teams in divisional Kho-Kho

विभागस्तरीय खो-खो स्पर्धेत अहिल्यानगर व सोलापूर संघाचा पराभव करीत पुणे जिल्हा संघाची राज्यस्तरीय स्पर्धेत दणक्यात एन्ट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
Marathi Language Conservation Fortnight celebrated at Savitribai Phule Women College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा

February 2, 2026
Spontaneous response from women entrepreneurs to BizQuin competition organized by Skilletz Foundation

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित बिझक्विन स्पर्धेला महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 2, 2026
NCP candidate Pallavi Sandeep Dabhade receives increasing support from voters in Induri Varale Zilla Parishad group Maval

इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे यांना मतदारांचा वाढता पाठींबा

February 1, 2026
Voters respond positively to Dr Ashok Vitthal Date candidature in Takve Budruk Nane Zilla Parishad group Maval

टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गटात डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

February 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.