व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळे सज्ज ; टेन्ट, हॉटेल्स, रिसॉर्ट, व्हिला बुकींगला पसंती

संपूर्ण देशभरातून पर्यटकांचा ओघ मावळकडे सुरू झाला असून तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असलेल्या ठिकाणचे टेन्ट हाऊस, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, व्हिला, फार्महाऊस आदी ठिकाणी बुकींग जवळपास फुल्ल होत आल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 28, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Pavana-Lake-Camping

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे – मुंबई या महानगरांच्या मध्यवर्ती भागात असलेला आणि निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला पर्यटनाचा तालुका असलेला मावळ तालुका आणि येथील सर्वच पर्यटनस्थळे आता सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. संपूर्ण देशभरातून पर्यटकांचा ओघ मावळकडे सुरू झाला असून तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असलेल्या ठिकाणचे टेन्ट हाऊस, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, व्हिला, फार्महाऊस आदी ठिकाणी बुकींग जवळपास फुल्ल होत आल्या आहेत.

नाताळ अर्था ख्रिसमस सणाच्या सुटीपासून सुरू झालेल्या सुट्ट्या आणि वीकेंड यामुळे मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. तर, वर्षाअखेर अर्थात थर्टी फर्स्ट आणि नूतन वर्षाचे स्वागत यामुळे दिनांक ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवसांत पर्यटकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोणावळा खंडाळा सहीत पवनमावळातील पवना डॅम, किल्ले लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, कोराईगड, जवळपास असणारे ताजे – भाजे लेणी, बेडसे लेणी, कार्ला लेणी, राजमाची किल्ला, लोणावळ्याजवळील फेमस लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, खंडाळा येथील ‘सनसेट पॉइंट’ तसेच तालुक्यातील अन्य ठिकाणी पर्यटक सरत्या वर्षाला निरोप देणे किंवा नूतन वर्षाचे स्वागत करणे पसंत करताता, यामुळे यापरिसरातील निवास व्यवस्था असलेले ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे.

नववर्ष स्वागत, सुट्ट्या व सप्ताहअखेरमुळे पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने ३०-३१ डिसेंबर ते एक जानेवारी २०२६ या कालावधीत पुणे, मुंबई, कामशेतकडून येणाऱ्या वाहनांना पवनानगर बाजारपेठेत येण्यास बंदी करण्यात आली आहे.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग – येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे) – कोथुर्णे गाव येथून डावीकडे कोथुर्णे / मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राह्मणोलीकडे वारू फाट्यावरून पुढे सरळ – ब्राह्मणोली फाटामार्गे जवण रस्ता मार्गे गणे, ठाकुरसाई, खडक गेव्हंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग या मार्गाने जावे -पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, पाले, धामनधरा, दुधिवरेकडे जाणारी वाहने तसेच जड / अवजड वाहनांना सोडण्यात येणार

खासगी बंगले, रिसोर्ट, हॉटेल, टेंट, कॅम्पिंग चालक मालकांनी नियमानुसार आवश्यक परवानग्या घेऊन व्यवसाय करावा. नववर्षाचे स्वागत करताना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, अशी सूचना लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी केली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला


dainik maval jahirat

Previous Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर

Next Post

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषद : कोण होणार नव्या प्रशासकीय इमारतीतील पहिला उपनगराध्यक्ष ? ‘या’ दिग्गजांची नावे चर्चेत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon Dabhade Municipal Council Who will be first Deputy Mayor in new administrative building

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषद : कोण होणार नव्या प्रशासकीय इमारतीतील पहिला उपनगराध्यक्ष ? 'या' दिग्गजांची नावे चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.