Dainik Maval News : मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे यांची पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र दिले असून त्यात विठ्ठलराव शिंदे यांच्यावर मावळ, मुळशी, भोर आणि राजगड या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
विठ्ठलराव शिंदे हे मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे जुने जाणते नेतृत्व असून स्थापनेपासून पक्षात सक्रीय आहेत. आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू आणि अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे विठ्ठलराव शिंदे यांच्यावर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली ही जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या विठ्ठलराव शिंदे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असून मावळ, मुळशी, भोर व राजगड या तालुक्यांची जबाबदारी देण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच, पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाचे ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य राहील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पत्रातून व्यक्त केला आहे.
विठ्ठलराव शिंदे यांच्या या नियुक्तीबद्दल आमदार सुनील शेळके यांनी विठ्ठलराव शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच प्रतिक्रिया देताना, मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या संघटन बांधणीत आणि पक्षाचे ध्येयधोरण तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विठ्ठलराव शिंदे हे सातत्याने प्रयत्नशील असतात. आता त्यांच्या नेतृत्वात चारही तालुक्यात पक्षाचा विस्तार अधिक जोमाने होईल, असे म्हटले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सुनील ढोरे ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून घोषणा
– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन ; भारतीय हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री, अशी होती कलमाडी यांची कारकीर्द
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी
