व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजितदादांच्या निधनानंतर मावळातील प्रचार थांबला ; राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाकडूनही प्रचाराला स्थगिती

शासकीय दुखवटा संपल्यानंतर प्रचार सुरू होण्याची शक्यता

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 30, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या निवडणुका होत आहेत. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणुक होत असतानाच बुधवारी (दि. २८) सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न आणि स्तब्ध झाला.

तसेच अजितपवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. यादरम्यान मावळ तालुक्यात मावळच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचेही बुधवारी निधन झाले. त्यामुळे मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार देखील पूर्णपणे थांबला असल्याचे चित्र आहे.

मावळ तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार सुनील शेळके हे असून मावळात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. दुसरीकडे अजित पवार हे सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याने वागणारे नेते असल्याने इतर पक्षांतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील अजितदादांच्या जाण्याचे हळहळले. एकूणच अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि सर्वच पक्ष अपक्ष नेते, पदाधिकारी, उमेदवार यांनी बुधवारपासून प्रचाराला जवळपास स्वल्पविराम दिला.

दरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेला तीन दिवसीय दुखवटा शुक्रवारी ३० जानेवारी नंतर संपेल आणि कदाचित त्यानंतर मावळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रचार पुन्हा सुरू होईल, असे दिसते. तसेच दादांच्या निधनानंतर आणि शासकीय दुखवटा गृहित धरून राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका देखील दोन दिवस पुढे ढकलल्या असून आता ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान तर ७ ऐवजी ९ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो


Previous Post

Ruplekha Dhore Funeral । मावळच्या पहिल्या महिला आमदार स्व. रुपलेखा ढोरे यांना हजारो मावळकरांचा साश्रूनयनांनी निरोप

Next Post

प्रचाराचं स्वरूप बदलणार.. सभा, रॅली थंडावणार.. डिजे, वाद्ये टाळणार.. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत केवळ कार्यकर्ते दिसणार..

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
NO DJ RALLY Halgi in Prachan rally in zp panchayat samiti

प्रचाराचं स्वरूप बदलणार.. सभा, रॅली थंडावणार.. डिजे, वाद्ये टाळणार.. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत केवळ कार्यकर्ते दिसणार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
Marathi Language Conservation Fortnight celebrated at Savitribai Phule Women College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा

February 2, 2026
Spontaneous response from women entrepreneurs to BizQuin competition organized by Skilletz Foundation

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित बिझक्विन स्पर्धेला महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 2, 2026
NCP candidate Pallavi Sandeep Dabhade receives increasing support from voters in Induri Varale Zilla Parishad group Maval

इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे यांना मतदारांचा वाढता पाठींबा

February 1, 2026
Voters respond positively to Dr Ashok Vitthal Date candidature in Takve Budruk Nane Zilla Parishad group Maval

टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गटात डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

February 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.