व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मार्केटयार्ड (पुणे) ते शिळींब (ता. मावळ) पीएमपीएमएल बससेवेचा प्रारंभ ; स्थानिकांच्या मागणीला आणि आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील प्रमुख गाव असलेल्या मौजे शिळींब गावापर्यंत आता पीएमपीएमएल बससेवा सुरु झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 11, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल
Market Yard Pune to Shilimb Maval PMPML bus service starts Success in follow-up of MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील प्रमुख गाव असलेल्या मौजे शिळींब गावापर्यंत आता पीएमपीएमएल बससेवा सुरु झाली आहे. गेली अनेक वर्षांपासून स्थानिक युवकांकडून होत असलेली मागणी आणि आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

बुधवारी (दि.११) सकाळी पहिल्यांदाच पीएमपीएमएल बस गावात पोहोचली आणि ग्रामस्थांना अत्यानंद झाला. ग्रामस्थांनी एकत्रित येत श्रीफळ वाढवून बसची पुजा केली. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बसचे चालक – वाहक यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिळींब गाव हे पवन मावळातील प्रमुख आणि मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. शिळींब ग्रामपंचायत ही चार गावांची ग्रामपंचायत असून पंचक्रोशीतील अनेक गावांसाठी येथे प्राथमिक बाजारपेठ आहे. या परिसरातून मुळशी तालुका आणि पुढे पुणे शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे, त्यामुळे थेट मार्केटयार्ड आणि पौड ते शिळींब अशी बससेवा सुरू झाल्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.

पवन मावळचा हा परिसर पर्यटनासाठी देशभरातील पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र आहे. अलीकडील काळात या भागात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा विकास चांगल्या प्रकारे झाला. परंतु सार्वनिक वाहतूक सुविधा आवश्यकतेनुसार नव्हती. या बससेवेमुळे हा प्रश्न सुटला आहे. – अक्षय धनवे (अध्यक्ष – रा.काँ. शिळींब)

मुळशी भागात जाणारे कामगार, विद्यार्थी यांसह सामान्य प्रवाश्यांना बस सुविधा नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु पीएमपीएमएल बस सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांची अडचण दुर झाली आहे. – शिवाजी दरेकर (स्थानिक, शिळींब)

शिळींब ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार पीएमपीएमएल प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार या भागातील नागरिकांची गरज लक्षात घेत ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पवन मावळातील या परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी हा नवीन पर्याय उपलब्ध झाला असून त्यातून परिसराच्या विकासाला हातभार लागेल. – आमदार सुनील शेळके, मावळ विधानसभा

मार्केटयार्ड-पौड-शिळींब बसचे वेळापत्रक
पहाटे 5.00 – मार्केटयार्ड ते शिळींब
सकाळी 7.30 – शिळींब ते पौड
सकाळी 9.15 – पौड ते शिळींब
सकाळी10.30 – शिळींब ते मार्केटयार्ड
दुपारी 2.15 – मार्केटयार्ड ते शिळींब
दुपारी 5.00 – शिळींब ते पौड
सायं 6.45 – पौड ते शिळींब
रात्री 8.00 – शिळींब ते मार्केटयार्ड

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू
– मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा ; भाजपाची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली


dainik maval jahirat

Previous Post

धनगव्हाण येथील आदर्श माता गंगुबाई घारे यांचे अल्प आजाराने निधन

Next Post

Talegaon Dabhade : मावळ तालुक्यातील शिक्षकांची शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न ; तालुकाभरातून २८८ शिक्षक उपस्थित

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Scholarship workshop for teachers in Maval taluka concluded 288 teachers from across taluka attended

Talegaon Dabhade : मावळ तालुक्यातील शिक्षकांची शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न ; तालुकाभरातून २८८ शिक्षक उपस्थित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.