Dainik Maval News : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील लक्षवेधी लढत ठरलेल्या इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी पक्षाच्या उमेदवार मेघा प्रशांत भागवत यांचा निसटता पराभव झाला. अत्यंत हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या मेघा भागवत विरुद्ध पल्लवी दाभाडे या लढतीत ६०९ मतांनी मेघा भागवत पराभूत झाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे या विजयी झाल्या.
दरम्यान निकालानंतरही मेघा भागवत यांनी खचून न जाता आपल्या गटातील मतदार नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. निवडणुकीत मेघाताई भागवत यांना १४ हजार २२२ मते मिळाली. त्यामुळे मतदान केलेल्या मतदारांचा प्रेमाचा व आशीर्वादाचा ऋणनिर्देश करण्यासाठी भागवत यांनी आभार दौरा आयोजित केला आहे.
आभार दौऱ्यात मेघाताई भागवत मतदारांची थेट भेट घेऊन धन्यवाद व्यक्त करीत आहेत. राजपुरी येथील आभार दौऱ्यात मतदारांनी मेघा भागवत यांचे स्वागत केले. तसेच पराभूत होऊनही मेघाताई जिंकल्या आहेत, त्या आमच्या मनात आहेत, अशा भावना व्यक्त केल्या. तर मेघा भागवत यांनी, निसटत्या पराभवाने खचून न जाता, आपल्या विश्वासातून मला अधिक बळ मिळाले, मतदारांनी दाखविलेला स्नेह आणि विश्वास हाच माझा खरा विजय असल्याची भावना व्यक्त केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मार्केटयार्ड (पुणे) ते शिळींब (ता. मावळ) पीएमपीएमएल बससेवेचा प्रारंभ ; स्थानिकांच्या मागणीला आणि आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू

