Dainik Maval News : मावळ तालुका वारकरी मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जेष्ठ विधिज्ञ ॲड खंडूजी तिकोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री घटेश्वर मंदिर, महागाव येथे ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
मावळ तालुका वारकरी मंडळाच्या अध्यक्षांचे अकाली निधन झाल्याने काही दिवसांपूर्वी रामायणाचार्य हभप विठ्ठल महाराज पांडे यांची मंडळाचे प्र. अध्यक्ष म्हणुन एकमताने निवड करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या मासिक मिटींगमधे अध्यक्ष पांडे महाराज, संघटक दिनकर निंबळे आणि संस्थापक नारायण केंडे यांनी नवीन कार्यकारिणीची निवड केली.
महागाव येथील श्री घटेश्वर मंदिरात पंचक्रोशीतील वारकरी आणि स्थानिक ग्रामस्यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे;
हभप भानुदास शिंदे, अनंता गो. कालेकर (उपाध्यक्ष), श्री ज्ञानदेव दहिभाते (सचिव), संजय घाडगे (सहसचिव), प्रकाश होजगे (कार्याध्यक्ष), बाळासाहेब वाघोले( सहकार्याध्यक्ष), हभप बाळासाहेब वरघडे (कोषाध्यक्ष),प्रल्हाद कालेकर(सहकोषाध्यक्ष) रघुनाथ आढाव( वारकरी शिक्षण समिती .प्रमुख) माऊली कंधारे( युवा समिती प्रमुख), श्री दत्तु राऊत(यात्रा कमिटी प्रमुख) बाळकृष्ण तुपे(यात्रा क.उपप्रमुख), अनंता दळवी(संपर्क प्रमुख)
सदर कार्यक्रमाचे आयोजन माऊली कंधारे, प्रकाश होजगे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री
– ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री
– श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू
– तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
