Dainik Maval News : श्रीक्षेत्र देहू येथे दिनांक ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न होत आहे.
या निमित्त राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक आणि वारकरी उपस्थित राहणार असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३३(१)(ठ) अन्वये प्राप्त अधिकारानुसार पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
यात्रा कालावधीत देहू नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर व सार्वजनिक जागेत संसर्गजन्य रोग्यांनी येऊ नये. तसेच संबंधित क्षेत्रात कोणताही संसर्गजन्य रुग्ण आढळल्यास देहू नगरपंचायतीने तयार केलेल्या शेडमध्ये त्यांना राहणे बंधनकारक राहील.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री
– ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री
– श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू
– तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
