व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत तुकाराम साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता ; ३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप, ३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

कारखान्याचा गळीत हंगाम साखर कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व विशेषतः ऊस तोडणी कामगार, ऊस वाहतूकदार यांच्यामुळे यशस्वी झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांनी दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 27, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. या हंगामात कारखान्याने तीन लाख ९७३.८३० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून तीन लाख ९ हजार ६७५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा ११.५६% इतका आलेला आहे.

सहवीज निर्मिती प्रकल्पामधून दोन कोटी ३७ लाख ११ हजार २०० युनिट वीज निर्मिती करून एक कोटी ४२ लाख ३० हजार ३० युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला निर्यात केली आहे. तसेच इथेनॉल प्रकल्पामधून रेक्टीफाईड स्पिरीट ४८ लाख ३६ हजार ५१४ लिटर्स व इथेनॉल ४१ लाख ५३ हजार ४१९ लिटर्स उत्पादित झाले असून, इथेनॉल उत्पादन चालू आहे.

कारखान्याचा गळीत हंगाम साखर कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व विशेषतः ऊस तोडणी कामगार, ऊस वाहतूकदार यांच्यामुळे यशस्वी झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांनी दिली.

गळीत हंगाम सांगता समारंभाला कारखान्याचे संचालक धैर्यशील ढमाले, धोंडीबा भोंडवे, राजेंद्र कुदळे, दत्तात्रेय उभे, छबूराव कडू, विलास कातोरे, भरत लिम्हण, अतुल काळजे, शिवाजी कोळेकर, संचालिका ज्योती अरगडे, शोभाताई वाघोले, माजी तज्ज्ञ संचालक ज्ञानेश नवले तसेच प्र. सचिव मोहन काळोखे, चीफ इंजिनिअर रणजितसिंह जगदाळे, मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत, सुरेश सस्ते, सुदाम पवार, सुरेश वाळुंज, चंद्रकांत गायकवाड, ऊस पुरवठा अधिकारी हिरामण गोपाळे, प्रदीप सावंत, रवींद्र शिंदे, सत्यवान पवार, देविदास उभे आदींसह सर्व कर्मचारी, ऊस तोडणी मजूर, ऊस वाहतूकदार उपस्थित होते.

यावेळी जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गळीत हंगाम २०२६-२७ साठी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये एकूण तीन हजार २९१.५८ हेक्टर उसाची नोंद असून, त्यापैकी खोडवा एक हजार ६४८.७६ हेक्टर व नवीन लागवड एक हजार ६४२.८२ हेक्टर इतकी नोंद कारखान्याकडे झाली आहे.

अद्याप उर्वरित नोंद घेण्याचे काम चालू आहे. हेक्टरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या शेतकी विभागाच्या वतीने व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु. व ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांच्या मार्फत गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती कार्यकारी संचालक एस. जी. पठारे यांनी दिली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री
– ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री
– श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू
– तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश


dainik maval jahirat

Previous Post

श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा २०२६ निमित्त संसर्गजन्य रुग्णांना देहू नगरपंचायत हद्दीत येण्यास मनाई

Next Post

आढले बुद्रुक येथे शनिवारी “स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान” चा लोकार्पण सोहळा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Inauguration ceremony of Late Ajitdada Pawar Pratishthan at Adhale Budruk Maval on Saturday

आढले बुद्रुक येथे शनिवारी "स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान" चा लोकार्पण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.