व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Maval NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंचायत समिती मावळच्या गटनेतेपदी दिलीप ढोरे यांची एकमताने निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पंचायत समिती मावळ च्या गटनेतेपदी इंदुरी गणातून निवडून आलेले दिलीप नामदेव ढोरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 27, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Dilip Dhore unanimously elected as group leader of Panchayat Samiti Maval in NCP meeting

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पंचायत समिती मावळ च्या गटनेतेपदी इंदुरी गणातून निवडून आलेले दिलीप नामदेव ढोरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांची बैठक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत ढोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

पक्षाचे दिवगंत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून कामकाजास सुरुवात करण्यात आली. नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांना गती देण्याचा संकल्पही बैठकीत करण्यात आला.

बैठकीस पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राजेंद्र कडलक, योगेश लोहर, समीर जाधव, सुनिता येवले, रेश्मा देवकर, शैला कालेकर, प्राची गायकवाड, आशा मोरमारे उपस्थित होते. आमदार सुनिल शेळके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीतील कामकाज अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्याचा निर्धार ढोरे यांनी व्यक्त केला.

दिलीप ढोरे यांनी सहकार, कृषी व पंचायत राज अशा क्षेत्रात विविध पदांवर काम केले आहे. कडजाई माता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पद त्यांनी भूषविले. ते मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. इंदोरी ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती.

निवडीनंतर बोलताना दिलीप ढोरे म्हणाले, “मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि शेतकरीहिताचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून ठोस व वेळबद्ध निर्णय घेणार आहे. आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न करणार आहे.”

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री
– ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री
– श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू
– तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश


Previous Post

जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ च्या नियोजन समिती अध्यक्षपदी प्रविण भवार

Next Post

“वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा–बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार”

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chief Minister Devendra Fadnavis

"वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा–बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.