Dainik Maval News : लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव, देहूरोड आदी मावळ भागातील हजारो नागरिक ज्यात विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यवसायिक आदींसाठी दररोजच्या प्रवासाचा प्रमुख आधार असलेल्या लोणावळा ते पुणे लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे. आधीच कोरोनापासून दुपारची लोकल बंद असल्याने प्रवशांची मोठी फरफट होत आहे.
पुणे आणि लोणावळा दोन शहरांना आणि मध्यंतरीच्या अनेक शहरांना जोडणारी लाइफलाइन म्हणून पुणे-लोणावळा लोकलची ओळख आहे. परंतु या महत्वाच्या लोकलमार्गावर साधारण बारापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत एकही लोकल फेरी उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. या काळात नवीन फेऱ्या सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी करीत आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी ११:२० च्या सुमारास सुटणाऱ्या लोकलनंतर थेट दुपारी ३:०० वाजता पुढील लोकल उपलब्ध आहे. हा सुमारे चार तासांचा खंड प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. पिंपरी-चिंचवड, तळेगाव, कामशेत आणि लोणावळा या भागातील प्रवाशांना पुणे शहरात कामासाठी किंवा उपचारासाठी आल्यानंतर परत जाण्यासाठी स्वस्त आणि वेगवान पर्याय राहत नाही.
पुणे-लोणावळा रेल्वे प्रवासी संघ आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. रेल्वेने या चार तासाच्या खंडात किमान दुपारी एक ते दीड च्या दरम्यान एक अतिरिक्त लोकल फेरी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री
– ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री
– श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू
– तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

