व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे दिनांक २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 2, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे दिनांक २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाच्या एक महिन्यानंतरही त्यांच्या जाण्याचा धक्का त्यांचे कार्यकर्ते, चाहते पचवू शकलेले नाहीत. मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते पै. सचिन घोटकुले हे एकेकाळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अन् पदाधिकारी होते. त्यांनाही अजित पवार यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. पक्ष बदलला तरीही अजित पवार यांच्या प्रति सचिन घोटकुले यांचे असलेले प्रेम सर्वश्रूत होते. त्यामुळे स्व. अजित पवार यांच्या जाण्यानंतर त्यांचा पुतळा सचिन घोटकुले यांनी उभारला आहे.

Novel NIBR Ads

अजित पवार यांना दि. २८ फेब्रुवारी रोजी जाऊन एक महिना पूर्ण झाला. अजितदादांच्या निधनाच्या एक महिन्यातच पै. सचिन घोटकुले यांनी स्व. अजित पवार यांचा राज्यातील पहिला पुतळा उभारला आहे. आढले बुद्रुक या आपल्या गावी असणाऱ्या स्व मालकीच्या गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या आवारात सचिन घोटकुले यांनी स्व. अजित पवार यांचा अर्धाकृती पुतळा उभारला असून शनिवारीच (दि. २८) या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

पै. सचिन घोटकुले यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या पत्नी अनिता घोटकुले ज्या गुरुकूल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या चेअरमन आहेत यांच्या पुढाकारातून हा पुतळा उभा राहिला आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष बबन भेगडे, सहकारमहर्षी माऊली दाभाडे, भाजपा नेते गणेश भेगडे, सुभाष जाधव, बाळासाहेब घोटकुले, ज्ञानेश्वर दळवी, संतोष मुऱ्हे, विशाल वहिले, प्रशांत भागवत, दादा डफळ, संभाजी राक्षे, शिवाजी असवले आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

तसेच याप्रसंगी मावळ तालुक्यातील “स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान” ह्या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. हे प्रतिष्ठान कोणतीही निधी, देणगी न घेता स्व. अजित पवार यांच्या स्वच्छता या आवडीच्या विषयावर काम करणार आहे.

पै. सचिन घोटकुले हे वर्षभरापूर्वीपर्यंत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते.परंतू मावळ तालुक्यातील राजकीय घडामोडीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. तसेच, काही महिन्यांपूर्वी भाजपात पक्षप्रवेश केला. असे असले तरीही स्व. अजित पवार यांनी राजकारणात दिलेली संधी आणि सन्मान न विसरता पै. सचिन घोटकुले यांनी आपल्या लाडक्या नेत्याला खास पद्धतीत श्रद्धांजली वाहिली आहे.

Novel NIBR Ads

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या
– पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी
– कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण


dainik maval jahirat

Previous Post

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

Next Post

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.