व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत कुमार आणि वरिष्ठ गटातील खेळाडूंनी अपूर्व ताकद, जिद्द आणि सहनशक्तीचे दर्शन घडवत वातावरण दणाणून सोडले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 4, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : धुलिवंदनाच्या उत्सवी आणि रंगतदार वातावरणात वडगाव मावळ येथे पारंपरिक दगडी गोटी उचलण्याच्या शिवकालीन मर्दानी खेळांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत कुमार आणि वरिष्ठ गटातील खेळाडूंनी अपूर्व ताकद, जिद्द आणि सहनशक्तीचे दर्शन घडवत वातावरण दणाणून सोडले.

कुमार गटात विराजचा ऐतिहासिक पराक्रम
कुमार गटात विराज अमोल वाघवले यांनी तब्बल ४०१ बैठका मारून नवा विक्रम प्रस्थापित केला. गतवर्षीचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर यांनी केलेल्या ३२१ बैठकांचा विक्रम विराज यांनी मागे टाकत आपल्या नावावर नवीन विक्रम नोंदवला. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव केला.

कुमार गटातील अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:
प्रथम: विराज अमोल वाघवले – ४०१ बैठका
द्वितीय: यश ओझरकर – ५३ बैठका
तृतीय: अंकीत ढोरे – ५१ बैठका
चौथा: आर्यन दौडे – १६ बैठका
वरिष्ठ गटातही चुरशीची लढत

वरिष्ठ गटातही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. खेळाडूंनी दगडी गोटी उचलून बैठका मारताना आपल्या शारीरिक क्षमतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला.

वरिष्ठ गटातील निकाल:
प्रथम: किशोर धोत्रे – १०१ बैठका
द्वितीय: यश प्रवीण चव्हाण – ३६ बैठका
तृतीय: गणेश अंकुश तुमकर – ३१ बैठका
चौथा: आदित्य आगळमे – २२ बैठका
पाचवा: विनीत वहिले – २१ बैठका

आकर्षक बक्षिसांनी गौरव
विजेत्यांना चांदीची गदा, चांदीचे कडे आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. जय बजरंग तालीम मंडळ यांच्या वतीने दिवंगत पै. केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ उमेश ढोरे यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट खेळाडूस चांदीची गदा प्रदान करण्यात आली.

प्रायोजकांच्या सहकार्याने विविध गटांतील विजेत्यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. वरिष्ठ गटातील प्रथम क्रमांकासाठी अतुल वायकर, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अरुण वाघमारे यांनी चषक देऊन सन्मान केला. कुमार गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे अक्षय बेल्हेकर, विनायक लवगारे व गणेश झरेकर यांनी चषक प्रदान केले.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, शिवजयंतीचे संस्थापक भास्करराव म्हाळस्कर, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, सुनील दंडेल, बाळासाहेब तुमकर, नगरसेवक दिनेश ढोरे अनंता कुडे विशाल वहिले शेखर वहिले, गणेश विनोदे ,संजय दंडेल सतिश गाडे,अविनाश चव्हाण, क्रीडा प्रशिक्षक सुनील चव्हाण, बिहारीलाल दुबे, राजेंद्र वहिले,सुधीर म्हाळसकर, बापूसाहेब वाघवले, सचिन ढोरे, अनिल कोद्रे, राजेंद्र म्हाळसकर,महेंद्र म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

धुलिवंदनाच्या पावन पर्वावर पार पडलेल्या या मर्दानी खेळांमुळे शिवकालीन परंपरेचे जतन होत असून युवकांमध्ये शौर्य, धैर्य आणि क्रीडाभावनेचा जागर निर्माण होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. वडगाव मावळमध्ये या स्पर्धेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या
– पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी
– कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण


Previous Post

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

Next Post

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indian-Railway

पुणे - लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन - वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.