Dainik Maval News : भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.३) सकाळी दहा वाजताच्या सुमारास बधलवाडी – नवलाख उंबरे रस्त्यावरील ह्युंदाई ग्लोविज कंपनीच्या वेअरहाऊस जवळ घडली.
याप्रकरणी सिद्धेश्वर शंकर लोहार (वय २९ वर्षे, रा. ताथवडे, पुणे मुळ रा. उजनी, ता. औसा, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. अविनाश कैलास ससाणे (रा. मु.पो. वेल्हावळे पोस्ट आंबोली, ता. खेड, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीवरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम २८१, १०६ (१), १२५ (अ) (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र चंद्रकांत शिवाजी हेमनार हे त्यांच्या ताब्यातील स्कूटर (क्रमांक MH 14 KT 7951 ) वरून बधलवाडी ते नवलाख उंबरे दरम्यान फ्लिपकार्ट कंपनी येथे जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार (क्रमांक MH 02 GH 1589 ) यातील आरोपी अविनाश कैलास ससाणे ह्याने त्याच्या ताब्यातील कार नवलाख उंबरे ते बधलवाडी अशा मार्गाने चालवित असताना, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालविली. यात निष्काळजीपणे कार चालविल्याने फिर्यादी चालवित असलेल्या स्कूटरला समोरून जोरदार धडक मारली व अपघात करून अपघातात फिर्यादी जखमी करणे आणि फिर्यादीचा मित्र चंद्रकांत हेमनार यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पुढील तपास ग्रेड पोलीस उप निरिक्षक जगदाळे हे करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या
– पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी
– कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण


