व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा ; ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पास मान्यता

९० कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर ; स्थानिकांसह, प्रवासी - पर्यटकांच्या मागणीला यश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 6, 2026
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Way cleared for construction of new flyover at Karla Phata Maval MSRDC approves project and fund

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळा शहराजवळील प्रसिद्ध कार्ला लेणी व एकविरा मंदिराकडे जाण्यासाठीचे प्रवेशद्वार असलेल्या कार्ला फाटा येथील वाहतूक कोंडीची समस्या आता लवकरच सुटणार आहे. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)ने मान्यता दिली आहे.

याकरिता एकूण ९० कोटी ३२ लाख रुपयांचा निधी उपअभियंता राहुल पवार यांनी मंजूर केला आहे. या पुलासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार सुनील शेळके यांच्यासहीत स्थानिकांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

कार्ला फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी होत होती. सुटीच्या दिवशी या कोंडीत भर पडते. सातत्याने छोटे-मोठे अपघात होत होते. त्यामुळे कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांसहीत प्रवशांकडून वारंवार होत होती. याबाबत खासदार बारणे यांनीही उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला.

त्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच आई एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आलेल्या श्री शिंदे यांनी कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याची घोषणा केली होती. तसेच प्रकल्पासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

याबाबत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, राज्यभरातून देवीच्या दर्शनासाठी भाविक कार्ला येथे येत असतात. पर्यटननगरी लोणावळ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांचीही मोठी गर्दी असते. येथे अनेकदा अपघात होतात. वाहनांची मोठी गर्दी होते. रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्याची नागरिकांची मागणी होती. त्यानुसार पूल उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

आई एकविरा देवी येथील विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उड्डाणपूल उभारण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार उड्डाणपूल उभारण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे या भागात होणारी वाहनांची गर्दी कमी करण्यास या पुलामुळे मदत होणार आहे.

वाहतूक सुरळीत होईल. अपघातांचे प्रमाण घटेल. कार्ला लेणी, एकवीरा देवी मंदिर पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरे लागणार नाही. या उड्डाणपूलासाठी ९० कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एमएसआरडीसीने मंजूर केला आहे. आता लवकर निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात होईल.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

मुख्यमंत्र्यांकडून राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांच्या स्मृतींना समर्पित ; स्व. अजितदादांचे स्मारक अन् त्यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा

Next Post

मावळ भाजपाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च अधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त, युवा नेतृत्वाकडे देणार सुत्र

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
bjp-party-flag

मावळ भाजपाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च अधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त, युवा नेतृत्वाकडे देणार सुत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.