व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रतिबंधित मांसाची वाहतूक होत असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी कंटेनर पकडला ; वडगाव मावळ पोलिसांकडून तपास सुरू

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 23, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
प्रतिबंधित मांसाची वाहतूक होत असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी कंटेनर पकडला ; वडगाव मावळ पोलिसांकडून तपास सुरू

Photo Courtesy : Team Dainik Maval


दैनिक मावळ (प्रतिनिधी) : वाहतुकीस प्रतिबंधित व निषिद्ध असलेले मांस वाहतूक करून नेत असल्याच्या संशयातून एक कंटेनर (क्रमांक NL 01 AK 5884) गोरक्षकांनी पकडला व पोलिसांच्या स्वाधीन केला. उर्से येथे शनिवारी (दि. 21) हा कंटेनर पकडण्यात आला. गोरक्षकांनी हा कंटेनर वडगाव मावळ पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. वडगाव मावळ पोलीस याप्रकरणी आता अधिक तपास करत आहे.

Novel NIBR Ads

सदर कंटेनरमध्ये गोमांस असल्याचा संशय गोरक्षकांना आहे. तसा तक्रार अर्ज वडगाव मावळ पोलिसांकडे प्राप्त झाला आहे. तर सदर कंटेनर मधून मांस वाहतूक होत असले तरीही ते निषिद्ध व प्रतिबंधित असे नसून कायदेशीर परवाना सहित ही वाहतूक होत असल्याचे संबंधित कंटेनरच्या चालकाने व मांस ज्या कंपनीचे आहे त्या कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे.

याप्रकरणी आता मांस तपासणी करून त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करता येईल. सद्यस्थितीत कंटेनर ताब्यात घेतला असून मांस चे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात येईल, असे पोलीस निरीक्षक, वडगाव मावळ, अभिजीत देशमुख यांनी दैनिक मावळशी बोलताना सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता गुलबर्गा येथून तळोजा येथे साधारण २६ टन मांस या कंटेनर मधून वाहतूक होत असलेची माहिती पुढे आली आहे. परंतु अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावमधील श्री डोळसनाथ महाराज यात्रेत दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश । Talegaon Dabhade Crime

Next Post

मावळातील कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयात संसाधनांचा अभाव ? रुग्णांना दर्जेदार व वेळेत उपचार मिळत नसल्याची परिस्थिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lack of facilities at new sub-district hospital in Kanhe Maval Patients are not getting quality and timely treatment

मावळातील कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयात संसाधनांचा अभाव ? रुग्णांना दर्जेदार व वेळेत उपचार मिळत नसल्याची परिस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.