व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयात संसाधनांचा अभाव ? रुग्णांना दर्जेदार व वेळेत उपचार मिळत नसल्याची परिस्थिती

मावळ तालुक्यातील कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालय मध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 23, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Lack of facilities at new sub-district hospital in Kanhe Maval Patients are not getting quality and timely treatment

Photo Courtesy : Team Dainik Maval


दैनिक मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालय मध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारतीत परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र याठिकाणी इमारत जरी नवीन असली तरीही सुविधा मात्र जुन्याच रुग्णालयातील असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळत नसल्याची तक्रार इथे येणारे नागरिक, रुग्ण यांच्याकडून होत आहे.

रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असून उपलब्ध डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. कमी संख्येने नर्सेस, कर्मचारी यामुळे अनेक रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडे किंवा मोठ्या रुग्णालयांकडे हलवावे लागत आहे. आपत्कालीन विभागातही आवश्यक त्या सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी आयसीयू ची ही सुविधा सुरू नसल्याने नागरिकांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे.

तसेच, दंतचिकित्सा संदर्भात देखील उपचार होत नसल्याचे समोर आले असून, त्या ठिकाणी फक्त दात काढण्यासाठी सांगितले जात आहे. रूट कॅनल करणे याचेही साहित्य इथे पुरेसे उपलब्ध नाही, असे सांगून पुढे पाठविण्यात येत आहे. याच्या व्यतिरिक्त इतरही काही अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व तपासणी यंत्रणा अपुरी असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. औषधसाठा आणि प्रयोगशाळा सेवांमध्येही अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत.

मावळ तालुक्यातील आंदर मावळ व इतर ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे केंद्र मानले जाते, मात्र सध्याच्या परिस्थितीत अपेक्षित दर्जाची सेवा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी संबंधित आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन रिक्त पदे भरणे, आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देणे आणि रुग्णालयातील सेवा सुरळीत कराव्यात, अशी मागणी केली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर कान्हे उपजिल्हा रुग्णालय सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

अपुरे मनुष्यबळ :
कान्हे येथे सुरू झालेले उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर व नर्सेस संख्याही अल्प प्रमाणात असल्याने तेथे उपचार घेण्यात आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. याचा परिणाम त्यांना खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे

रक्त लघवी चेक करण्यासाठी गेलो असता आता तपासणीसाठी द्या, दोन दिवसांनी तुम्हाला रिपोर्ट मिळून जातील असे सांगितले. नाईलाजाने मला तिथून खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावे लागले. हे रुग्णालय नक्की गोरगरिबांसाठी आहे की नाही, असा माझ्या मनात प्रश्न उपस्थित राहिला. तरी प्रशासनाने या रुग्णालयाकडे लक्ष देऊन गोरगरिबांना उपचार कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे. – गणेश चिखले, नागरिक, मावळ

ज्यावेळी मी सोनोग्राफी करण्यासाठी गेलो, त्यावेळी सांगण्यात आले की आठवड्यातले दोनच दिवस सोनोग्राफी केली जाते. सोमवार व बुधवार मी तिथे गेलो असता सोनोग्राफीसाठी लांबच लांब रांगा होत्या. त्यामुळे सोनोग्राफी करण्यासाठी दिवस जातो, अत्यावश्यक असणार असल्यास काही नागरिक रांगा पाहून पर्यायी खासगी हॉस्पिटलमध्ये जातात. तरी याकडे प्रशासनाने लक्ष देऊन या ठिकाणी सुविधा सुरळीत कराव्यात. किरण काजळे, नागरिक, मावळ

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना


dainik maval jahirat

Previous Post

प्रतिबंधित मांसाची वाहतूक होत असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी कंटेनर पकडला ; वडगाव मावळ पोलिसांकडून तपास सुरू

Next Post

चिठ्ठीद्वारे ठरणार सभापती व उपसभापती ! मावळ बाजार समितीचा आगळावेगळा फॉर्म्युला ; ३ महिन्यांचा सभापती, ६ महिन्यांचा उपसभापती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chairman Deputy Chairman to be elected by ballot Maval Market Committee unique formula

चिठ्ठीद्वारे ठरणार सभापती व उपसभापती ! मावळ बाजार समितीचा आगळावेगळा फॉर्म्युला ; ३ महिन्यांचा सभापती, ६ महिन्यांचा उपसभापती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.