व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

मावळ तालुक्यातील जाधववाडी धरण (नवलाख उंबरे) आणि साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून एकूण चार तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 1, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Friday turned out to be a disaster 4 people drowned in two separate incidents in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शुक्रवारी ( दि. १ मे ) महाराष्ट्र दिनी असलेल्या सार्वजनिक सुट्टीचा बेत साधून मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आणि पाणी असलेल्या ठिकाणी जलविहार करण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन ठिकाणी घडलेल्या घटनेंत एकूण चार युवकांचे बळी गेले आहेत.

मावळ तालुक्यातील जाधववाडी धरण (नवलाख उंबरे) आणि साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून एकूण चार तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाधववाडी धरणात तिघांचा मृत्यू
जाधववाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांपैकी अजय गारुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार हे पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने एकूण पाच जण बुडाले. त्यापैकी दोघांना स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले, मात्र तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या तरुणांना बाहेर काढून सीपीआर देण्यात आला, परंतु बराच वेळ उलटल्यामुळे त्यांना वाचवण्यात अपयश आले.

पवना नदीत एकाचा मृत्यू
दुसरी घटना साळुंब्रे येथील जुन्या दगडी पुलाजवळ घडली. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा तरुण सकाळी सुमारे ८ वाजता नदीत पोहण्यासाठी उतरला होता. पाण्याची खोली न समजल्याने तो बुडाला. मनोज हा स्थानिक काळोखे पाईप लाईन कंपनीत काम करत होता.

रेस्क्यू ऑपरेशन आणि मदतकार्य
घटनेनंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि NDRF च्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले.

जाधववाडी येथील तिघांना ‘विरा ॲम्बुलन्स’च्या मदतीने जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथे नेण्यात आले, तर साळुंब्रे येथील तरुणाला पुढील तपासणीसाठी पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

रेस्क्यू टीमचे योगदान
या मोहिमेत निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, कमल परदेशी, शुभम काकडे, विकास दोड्डी, भारत मेहेंदळे, अनिश गराडे .कमलेश राक्षे, सर्जेस पाटील, विकी दौंडकर, अविनाश कार्ले, रवी कोळी, कुंदन भोसले, हर्षद काळोखे, राजू सय्यद, करण भांगरे तसेच विरा ॲम्बुलन्स टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

नागरिकांना आवाहन
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धरण, नदी परिसरात फिरताना विशेष काळजी घ्यावी. पाण्याची खोली, प्रवाह आणि सुरक्षिततेची साधने यांची खात्री करूनच पाण्यात उतरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण
– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोणावळा बसस्थानकाची पाहणी
– ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला चालना
– मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

Next Post

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
SSC-HSC-Exam-Result

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी - पाहा सविस्तर निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.