Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील घरमालकांनी भाडेकरूंची माहिती नजीकचे पोलीस स्टेशन येथे देणे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – २०२३ चे कलम १६३ अन्वये बंधनकारक असल्याचे आदेश पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येत असतात.
त्याअनुषंगाने एप्रिल २०२६ मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडु नये व कोणी बांगलादेशी इसम अनधिकृतपणे राहत आहे का, याची पडताळणी करण्यासाठी आयुक्तालय स्तरावरील दहशतवाद विरोधी शाखा (ATB) व पोलीस स्टेशन स्तरावरील दहशतवाद विरोधी कक्ष ( ATC ) यांचेमार्फत अनधिकृत भाडेकरूंची शोध मोहिम राबविण्यात आली.
त्यानुसार सदर शोध मोहिमेदरम्यान ज्या घरमालकांकडे अनधिकृतपणे राहणारे भाडेकरु मिळून आले, अशा घरमालकांविरुध्द भारतीय न्याय संहिता – २०२३ चे कलम २२३ प्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत एकुण ३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्व घरमालकांनी आपल्याकडे राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती व कागदपत्रे घेवून त्यांची पडताळणी करणेसाठी जवळच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक असून सदर भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला न दिल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
याशिवाय नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपले नजीक कोणी बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्यास किंवा एखादा संशयित इसम आढळून आल्यास त्याबाबत माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय, चिंचवड येथे दहशतवाद विरोधी शाखा (ATB) येथे आपण देवू शकता. माहिती देणाऱ्या इसमांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा प्रदीप जाधव यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा (ATB) व पोलीस स्टेशन स्तरावरील दहशतवाद विरोधी कक्ष ( ATC ) यांनी केली आहे. प्रदीप जाधव, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पिंपरी-चिंचवड यांनी ही माहिती दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती

