व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

फिनिक्स मेकॅनो कंपनीच्या सहकार्यातून पूर्ण होणार काम

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 10, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनमावळ (प्रतिनिधी – रवि ठाकर) : पवन मावळातील आजिवली येथे असणाऱ्या श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन या शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

मावळ विकास मंडळ ह्या संस्थेची श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन, जवण (आजिवली, ता. मावळ) येथे शासनमान्य माध्यमिक शाळा आहे. याच शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा काही दिवसांपूर्वीच सहकार महर्षी ज्ञानेश्वर उर्फ माऊलीभाऊ दाभाडे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून फिनिक्स मेकॅनो प्रा. लि. उर्से या कंपनीच्या सीएसआर निधीतून हे काम होणार आहे.

कंपनीच्या माध्यमातून शाळेच्या आठ वर्ग खोल्या तसेच प्रसाधनगृहे बांधण्याचा आराखडा संमत करून पुढील सहा ते सात महिन्यात हे बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प कंपनीचे अधिकारी सचिन पवार आणि उमेश बारवकर यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशस्त इमारत आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सचिन पवार यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक सचिव प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी केले. यावेळी बोलताना बाळसराफ यांनी, शाळेची प्रशस्त इमारत बांधण्याचे संस्थेचे अनेक वर्षांचे स्वप्न इमारत बांधणीनंतर पूर्ण होईल, असे सांगितले.

याप्रसंगी पंचायत समिती सदस्या शैलाताई कालेकर, सरपंच आशाताई भिकोले, कृ.उ.बा.स. माजी सभापती संभाजी शिंदे, सरपंच सिद्धांत कडू, पोलीस पाटील रूपाली लायगुडे यांसह नवनाथ राऊत, अक्षय धामणकर, कंत्राटदार श्री. वाघोले, स्वाती दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मावळ विकास मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक वसंत पवार, खजिनदार स्नेहल बाळसराफ, डॉ. केतकी संकेत नाळे, शाळेचे मुख्याध्यापक रमेश आरगडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वर्षा बारबोले यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक वसंत पवार यांनी केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता


dainik maval jahirat

Previous Post

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

Next Post

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

'इंग्रजी' भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे 'साईनाथभाऊ' झाले दहावी पास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.