व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांच्या प्रशासनाला सूचना, विविध विभागांचा घेतला आढावा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 20, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

Photo Courtesy : Team Dainik Maval


दैनिक मावळ (प्रतिनिधी) : मावळ विधानसभा मतदारसंघात केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या विकासकामांना गती द्यावी. कामांचा दर्जा राखावा. पावसाळापूर्व कामे वेगात पूर्ण करावीत. शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

मावळ तालुक्याची विविध शासकीय विभागांची आढावा बैठक खासदार बारणे, आमदार शेळके यांनी शुक्रवारी (दि. १९ जून) पंचायत समिती कार्यालयात घेतली. यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख, मावळ पंचायत समिती सभापती सुनिता येवले, उपसभापती साहेबराव कारके, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, मनीषा मुर्हे, पल्लवी दाभाडे, अनंत पावशे, पंचायत समिती सदस्य प्राची गायकवाड, दिलीप शिंदे, राजेंद्र कडलक, शैला कालेकर, आशा मोरमोर, रेश्मा देवकर, योगेश लोहर यांसह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शिक्षण, अंगणवाडी, कृषी, आरोग्य, स्थापत्य विषयक कामांचा आढावा घेतला.

केंद्र सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. या कामाचा दर्जा राखावा. कामाला गती द्यावी. मुदतीत कामे पूर्ण करावीत. घरकुल योजनेतील त्रुटी दूर कराव्यात. पीएमआरडीए आणि वन विभागाकडून घरकुलसाठी ना-हरकत दाखला मिळत नसल्याची तक्रार आहे. नागरिकांना तत्काळ दाखले द्यावेत. रस्त्यासह विविध भागांतील विकास कामाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी येतात. निकृष्ट दर्जाचे काम होता कामा नये. कामाचा दर्जा राखावा. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. वैद्यकीय सुविधा दर्जेदार द्यावी. रुग्णांशी व्यवस्थित संवाद साधावा. डॉक्टर, नर्स अधिकचे मनुष्यबळ पुरविण्यात येईल.

पावसाळापूर्वीची कामे पूर्ण करावीत. नालेसफाई शंभर टक्के पूर्ण करावी. पावसाळ्यात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. दरवर्षी जेथे पाणी साचते, तेथील पाणी तत्काळ काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना मुदतीत खते पुरविण्यात यावीत. शेतकऱ्यांना सातत्याने पावसाचे अपडेट द्यावेत, अशा सूचना बैठकी दरम्यान खासदार बारणे, आमदार शेळके यांनी दिल्या आहेत.

फुगेवाडी परिसरात विषारी दारूमुळे तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यात अवैध धंदे सुरू राहता कामे नयेत. धडक कारवाया कराव्यात. ड्रग्ज, अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर मोक्काची कारवाई करण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, युवासेना मावळ तालुका प्रमुख विशाल लोखंडे, उपतालूका प्रमुख अमित कुंभार, धनंजय नवघने, सोमनाथ कोंडे,मदन शेडगे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती
– मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?
– महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’
– भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
Potholes plague the roads in rural areas of Maval Taluka

मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य !

August 11, 2026
Potholes on Indrayani River bridge near Takve Budruk risk of accidents for both two-wheelers four-wheelers

टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.