Dainik Maval News : वडगाव मावळ येथील श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास भारतीय टपाल विभागाने Permanent Pictorial Cancellation (PPC) अर्थात कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे वडगावच्या इतिहासाला राष्ट्रीय स्तरावर अधिकृत ओळख मिळाली असून, शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अजित दिगंबर देशपांडे यांनी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी यासाठी भारतीय टपाल विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. वडगाव नगरपंचायतीने आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देत या उपक्रमाला सहकार्य केले होते. त्यानंतर पुणे ग्रामीण डाक विभागामार्फत प्रस्ताव मुंबई परिमंडळ कार्यालयाकडे पाठविण्यात आला. मुंबई परिमंडळाने १९ मे २०२६ रोजी प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर २६ मे २०२६ रोजी अधिकृत मान्यतापत्र जारी करण्यात आले.
भारतीय टपाल विभागाने आता उद्घाटन सोहळ्याची तारीख, स्थळ आणि प्रमुख पाहुण्यांची माहिती मागविली असून, त्यानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. यासाठी अजित देशपांडे यांनी वडगाव नगरपंचायतीकडेही उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
या कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यामुळे महादजी शिंदे स्मारकाची छाप देशभरातील टपालावर उमटणार आहे. त्यामुळे वडगावचा इतिहास, वारसा आणि सांस्कृतिक ओळख देशभर पोहोचणार असून, पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हा सन्मान संपूर्ण वडगावकरांसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


