Dainik Maval News : ‘पवना थेट जलवाहिनी प्रकल्पा’बाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रलंबित प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी मुंबईतील विधानभवन येथे दुपारी ३ वाजता एका विशेष संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत केलेल्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे. मावळ आणि पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रण :
पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळमधील शेतकरी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींमध्ये विविध मतमतांतरे आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांना विश्वासात घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी ही बैठक होणार आहे. या बैठकीला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भाजपा-महायुती सरकारने वर्षभरापूर्वीच पवना थेट जलवाहिनी प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश रद्द केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा सुरू होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


