व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

विधानसभा तालिका अध्यक्ष हे मूळ विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या गैरहजेरीत सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी नियुक्त केलेले सदस्य असतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 24, 2026
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (दि. २२ जून) सुरुवात झाली आहे. या दरम्यान, विधानसभा कामकाजासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली आहे. यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांचीही तालिका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Novel NIBR Ads

आमदार शेळके यांच्या समवेत आमदार योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील-चिखलीकर, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांचीही विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे ॲड. नार्वेकर यांनी जाहीर केले. आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव झाल्याबद्दल तालुकावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विधानसभा तालिका अध्यक्ष :
विधानसभा तालिका अध्यक्ष हे मूळ विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या गैरहजेरीत सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी नियुक्त केलेले सदस्य असतात. त्यांना पीठासीन अधिकाऱ्याचे सर्व अधिकार प्राप्त होतात. अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांच्या अनुपस्थितीत ते विधानसभेचे कामकाज व्यवस्थित आणि सुरळीतपणे चालवतात. सभागृहात शिस्त आणि शांतता राखण्याची मुख्य जबाबदारी त्यांची असते. नियमबाह्य वर्तन करणाऱ्या सदस्यांवर ते कारवाई करू शकतात. आमदारांना सभागृहात भाषणाची परवानगी देणे आणि चर्चेचा क्रम ठरवण्याचे अधिकार त्यांना असतात. तालिका अध्यक्षांना वेगळे किंवा अतिरिक्त अधिकार नसतात. ते फक्त कामकाज निर्विघ्न सुरू राहावे, यासाठी अध्यक्षांच्या खुर्चीवर बसतात. निर्णयक्षमता, स्थगन, प्रस्ताव मंजूरीचे अधिकार मात्र अध्यक्षांकडेच असतात.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा
– बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल
– महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

Next Post

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद

June 24, 2026
drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.