व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Lonavala Crime : लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

लोणावळा परिसरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 19, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
crime-arrested

File Photo


Dainik Maval News : लोणावळा परिसरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ लाख ९३ हजार ९०० रुपये किमतीचे ‘एमडी’ (मेफेड्रॉन) हे अंमली पदार्थ जप्त केले असून, एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२६ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास मॅकडोनाल्डस खालील वाहन पार्किंग परिसरात एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार गणेश होळकर यांनी या ठिकाणी धाव घेतली. यावेळी रोहन शंकर साठे (वय २२, सध्या रा. गुरव वस्ती, कुसगाव, ता. मावळ; मूळ रा. आपटी गेव्हंडे, ता. मावळ) या तरुणाची झडती घेतली असता, त्याच्याकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत अंमली पदार्थ आढळून आला.

अंमली पदार्थांचा साठा जप्त
पोलिसांनी रोहन साठे यांच्याकडे असलेल्या पदार्थाची तपासणी केली असता, त्यात १९ ग्रॅम ३९ मिलीग्रॅम वजनाचे ‘एमडी’ (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ मिळून आला. या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची बाजारपेठेत किंमत १ लाख ९३ हजार ९०० रुपये इतकी आहे.

रोहन साठे याच्यावर अंमली पदार्थ विक्रीचा उद्देश आणि बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कलम ८(क), २२(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक (मपोसई) गव्हाणे करत आहेत. या कारवाईमुळे मावळ परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, लोणावळा शहरांमध्ये एमडी पावडर, गांजा, चरस अशा अमली पदार्थांची विक्री होत आहे. यावर कडक कारवाई करत तरुणाईला या अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढणे यासाठी पोलीस प्रशासन सातत्यपूर्ण कारवाया करणार आहे. अमली पदार्थ तस्करांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती
– मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?
– महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’
– भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

Next Post

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
Potholes plague the roads in rural areas of Maval Taluka

मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य !

August 11, 2026
Potholes on Indrayani River bridge near Takve Budruk risk of accidents for both two-wheelers four-wheelers

टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.