व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींनी पूर्वनियोजित कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 1, 2026
in देश-विदेश, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Ketan Agrawal Murder Case Police custody of Siya Goyal Chetan Chaudhary extended until July 3

Photo Courtesy : Team Dainik Maval


दैनिक मावळ (प्रतिनिधी) : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत वडगाव मावळ न्यायालयाने ३ जुलैपर्यंत, म्हणजेच पाच दिवसांची वाढ केली आहे. सोमवारी (दि. २९) पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासातील काही महत्त्वाच्या बाबी अद्याप प्रलंबित असून त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.

Novel NIBR Ads

सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींनी पूर्वनियोजित कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, हा कट नेमका कुठे रचला गेला, लोहगड परिसरात पूर्वी रेकी करण्यात आली होती का, तसेच या कटात अन्य कोणाचा सहभाग होता का, याचा तपास करणे आवश्यक आहे. याशिवाय केतन अग्रवाल यांचा पासपोर्ट शोधणे, मोबाईलमधील माहिती पुनर्प्राप्त (रिकव्हर) करणे आणि आरोपींनी लपविलेली माहिती मिळविणे आवश्यक असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

यावर बचाव पक्षाने आक्षेप घेत आरोपींना अटक कायदेशीर पद्धतीने झाली आहे का, याबाबतचा अर्ज दाखल करून घेण्याची मागणी केली. पुढील तपास प्रामुख्याने तांत्रिक स्वरूपाचा असल्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. तसेच नाट्यरूपांतरणाची मागणी कायद्यात अभूतपूर्व असल्याचे सांगत मृत्यूला थेट हत्या म्हणणे योग्य नसल्याचाही दावा बचाव पक्षाने केला.

तसेच हा गुन्हा जामीनपात्र आहे, त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नये, असा युक्तिवाद सिया गोयल यांच्या वतीने ॲड. विपुल दुष्यंत यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

Next Post

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
High-level inspection of Dehu-Alandi Palkhi route ahead of Ashadhi Wari 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers Loan Waiver Scheme Details borrowers uploaded by PDCC

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ : ‘पीडीसीसी’कडून १.०८ लाख कर्जदारांचा तपशील अपलोड

July 1, 2026
High-level inspection of Dehu-Alandi Palkhi route ahead of Ashadhi Wari 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी

July 1, 2026
Ketan Agrawal Murder Case Police custody of Siya Goyal Chetan Chaudhary extended until July 3

केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

July 1, 2026
Farmers rise up again against Pavana closed-conduit pipeline project protest on Wednesday

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

July 1, 2026
Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.