व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

राज्य शासनाकडून पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येताच शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये पुन्हा एकदा तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 1, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Farmers rise up again against Pavana closed-conduit pipeline project protest on Wednesday

Photo Courtesy : Team Dainik Maval


दैनिक मावळ (प्रतिनिधी) – पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा तसेच पवना धरणग्रस्त प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे प्रलंबित पुनर्वसन, पर्यायी जमीन आणि मोबदल्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागण्यांसाठी पवना बंदिस्त जलवाहिनी कृती समिती, मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय संघटना आणि शेतकरी यांच्या वतीने बुधवारी (दि. १ जुलै) सकाळी ११ वाजता मावळ पंचायत समितीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Novel NIBR Ads

याबाबतचे निवेदन मावळचे तहसीलदार यांना देण्यात आले. तसेच या निवेदनाच्या प्रती मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय भेगडे तसेच वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाकडून पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येताच शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये पुन्हा एकदा तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, पर्यायी जमीन आणि मोबदल्याचे प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले आहे.

निवेदन देताना पवना बंदिस्त जलवाहिनी कृती समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, विश्वनाथ शेलार, शिवसेना नेते भारत ठाकूर, माजी सभापती एकनाथराव टिळे, जमीन हक्क समितीचे अध्यक्ष सुभाषराव धामणकर, यशवंत बोडके, जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष माऊली सोनवणे, भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष सूर्यकांत सोरटे, नारायण बोडके आदी उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

Next Post

केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ketan Agrawal Murder Case Police custody of Siya Goyal Chetan Chaudhary extended until July 3

केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ketan Agrawal Murder Case Police custody of Siya Goyal Chetan Chaudhary extended until July 3

केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

July 1, 2026
Farmers rise up again against Pavana closed-conduit pipeline project protest on Wednesday

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

July 1, 2026
Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.