व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

दुपारी पालखी देहूच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाखल होताच ग्रामस्थ आणि भाविकांनी फुलांचा वर्षाव केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2026
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारीतील पालखी सोहळा रविवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमारास तीर्थक्षेत्र देहूत परतला. देहूकरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.

पहाटे नित्यपूजा झाल्यानंतर पिंपरीगाव येथील श्री भैरवनाथ मंदिरातून पालखी सोहळा वारकरी देहूकडे मार्गस्थ झाला. पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोडमार्गे चिंचोली येथील शनी मंदिराजवळ पालखीचा विसावा झाला. यावेळी अभंग आरती करण्यात आली. दुपारी पालखी देहूच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाखल होताच ग्रामस्थ आणि भाविकांनी फुलांचा वर्षाव केला. फटाक्यांची आतषबाजी करत पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी पालखी रथाच्या बैलजोडीचे औक्षण केले. तर वेशीजवळ रामचंद्र तुपे कुटुंबीयांच्या वतीने दहीभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, देहू नगरपंचायतीचे नगरसेवक-नगरसेविका, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पालखी रथातून खांदेकऱ्यांनी पालखी खांद्यावर घेतली. हनुमान मंदिरासमोर संतपर अभंग झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाली.

संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानी आरती करण्यात आली. मुख्य मंदिरात पालखीचे आगमन झाल्यानंतर चांदीची अब्दागिरी, गरुड टक्के आणि रेशमी छत्रासह पालखीची देऊळवाड्यात प्रदक्षिणा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आरती झाली. यावेळी तुतारी, शंख, नगारा आणि ताशांच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

भजनी मंडपात संस्थानच्या वतीने सेवेकरी, मानकरी आणि दिंडीचालकांचा नारळ-प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. पालखी सोहळ्यादरम्यान सेवा बजावणारे पोलीस, गृहरक्षक दल, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय पथकाचे संस्थानच्या वतीने आभार मानण्यात आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
– तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द
– पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?


dainik maval jahirat

Previous Post

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

Next Post

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

August 10, 2026
Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.