Dainik Maval News : होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन व गेस्टॅम्प कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कुणे गावात नशाबंदी अभियानांतर्गत (दि. २३) जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये एकूण ५२ महिलांनी सहभाग घेतला. सावळा, इंगळून व पिंपरी ग्रुप ग्रामपंचायतींतील १३ अंगणवाडी सेविका, सीआरपी, उपसरपंच लीलाबाई करवंदे आणि पोलीस पाटील शिल्पा थरकुडे उपस्थित होत्या.
संस्थेच्या सीएफएफ मंगल जाधव यांनी व्यसनांचे दुष्परिणाम व बालसंगोपनावर होणारे परिणाम समजावून सांगितले. सीएफएफ वंदना पारगे यांनी बालसंरक्षण व बालहक्क, तर अश्विनी हेंद्रे यांनी महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस पाटील शिल्पा थरकुडे यांनी जनजागृती उपक्रम राबवल्याबद्दल होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन व गेस्टॅम्प कंपनीचे आभार मानले.
कार्यक्रमाचे आयोजन सीएफएफ मंगल जाधव, वंदना पारगे व अश्विनी हेंद्रे यांनी कम्युनिटी आणि चाइल्ड डेव्हलपमेंट विभागाच्या मॅनेजर वैशाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या वतीने केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे
