Dainik Maval News : विसापूर किल्ल्यावर वरुण चौधरी (वय 21), डी. वाय. पाटील कॉलेज, आकुर्डी येथील विद्यार्थी किल्ल्यावर फिरायला आला होता. वर जाताना गोरेवस्ती मालेवाडी बाजुने गेला होता. किल्ल्यावरून परत खाली येताना तो रस्ता चुकत चुकत एका घरळईत गेला. पाय घसरल्यामुळे तो अवघड ठिकाणी अडकून पडला होता. जवळपास अडीच ते तीन तास तो एकाच ठिकाणी अडकून होता.
अखेर त्याने शिवदुर्ग रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने तातडीने किल्ल्यावर पोहोचली. साडे चार वाजता किल्ला चढायला सुरुवात केली आणि साडे पाच वाजता त्याच्या जवळ पोहचलो. पाय घसरुन पडल्यामुळे वरुणच्या गुडघ्याला लागल्याने त्याला स्वतःहून बाहेर पडणे शक्य होत नव्हते.
अजित तिकोणे यांनी त्याचा जॅकेटच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढले.तो पाऊसामुळे पुर्ण भिजला होता. त्याच्या फोनला चार्जिंग कमी होती. तसेच तो अंधाराच्या आधी भेटला नाही तर शोधने कठीण गेले असते.
सुटकेनंतर त्याला पायाला दुखापत झाल्यामुळे एकट्याने चालता येत नव्हते. म्हणुन त्याला पाटण गावात खाली घेऊन आलो. पुन्हा गाडीवर गोरेवस्ती येथे आणण्यात आले आणि सायंकाळी सात वाजता त्याच्या गाडी जवळ सुखरुप पोहोचवले.
आजची टिम : अजित तिकोणे व अनिकेत आंबेकर
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे

