मावळ तालुक्यात सध्या चोरांचा सुळसुळात झालेला दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच तळेगाव दाभाडे येथील दुर्गा माता मंदिरात दानपेटी चोरी ला गेली. त्यानंतर आता टाकवे खुर्द गावातील मुख्य काळ भैरवनाथ मंदिरातच चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. ( Theft At Kal Bhairavanath Temple In Takve Khurd Village Of Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
टाकवे खुर्द येथे काळ भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरातील अनेक गोष्टी चोरीला गेल्याचा प्रकार बुधवार (4 जानेवारी) रोजी उघडकीस आला. चोरट्यांनी मंदिरातील डिजिटल टीव्ही डिस्प्ले, दोन मोठ्या पितळी घंटा, देवाला अर्पण केलेल्या दहा लहान पितळी घंटा, मंदिरात असणारा पितळी कलश, गडू आणि शेजारील मंदिरात पिंडीवर असणारा कलश अशा सर्व वस्तूंची चोरी करत पोबारा केलाय.
या घटनेमुळे टाकवे खुर्द ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून लोणावळा ग्रामीण पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडेतील दुर्गामाता मंदिरात चोरी, अवघ्या 30 सेकंदात दानपेटी घेऊन चोरटे पसार, घटना सीसीटीव्हीत कैद
– कामशेत पोलिसांची लई भारी कामगिरी! द्रुतगती मार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या 24 तासात मुसक्या आवळल्या, वाचा संपूर्ण प्रकरण