व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेना अवजड वाहतूक सेनेतर्फे आयआरबी प्रशासनाला सज्जड इशारा, ‘सुविधा द्या नाहीतर…’

शिवसेना अवजड वाहतूक सेनेतर्फे आयआरबी प्रशासनाला मंगळवारी (10 जानेवारी) निवेदन पत्र देण्यात आले. यावेळी आयआरबीकडून टोल वसूलीच्या बदल्यात प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांबात तक्रार करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Letter-To-IRB-Administration

Photob : Naresh Kalvit


शिवसेना अवजड वाहतूक सेनेतर्फे आयआरबी प्रशासनाला मंगळवारी (10 जानेवारी) निवेदन पत्र देण्यात आले. यावेळी आयआरबीकडून टोल वसूलीच्या बदल्यात प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांबात तक्रार करण्यात आली. अपघातावेळी प्रवाशांना जी आपत्कालीन सेवा पुरवली जाते आणि उपचारासाठी उभारण्यात आलेले ट्रॉमा केअर सेंटर यांची झालेली दुर्दशा, याबाबत शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेना विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आयआरबीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

द्रुतगती महामार्गावर प्रवाशांचे वाहन बंद पडले असता किंवा वाहनाचा अपघात झाल्यावर आयआरबी तर्फे वाहन टो करुन देण्याची सेवा किंवा रुग्णावहिकेचे सेवा मोफत देणे बंधनकारक आहे, मात्र महामार्गावर खासगी टोईंग सेवा आणि रुग्णवाहिका धावतात आणि प्रवाशांकडून अवाजावी पैसे वसूल करतात, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लगावला आहे. खोपोलीकडून लोणावळा शहराच्या दिशेने चुकीच्या पद्धतीने अवजड वाहने महामार्ग पोलिसांच्या वरदहस्तामुळे बिनदिक्कत वर येतात, असा गंभीर आरोपही लगावण्यात आलाय.

‘जर आयआरबी प्रशासन द्रुतगती महामार्गावर प्रवासादरम्यान टोल आकारत असेल, तर त्या बदल्यात सुविधा देणे बंधनकारक आहे’, असे मत शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत मेने आणि शिवसेना अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – जागरूक नागरिकामुळे वाचले जखमी पक्ष्याचे प्राण, करुंज गावात प्राणीमित्रांकडून लांडोरला जीवदान – पाहा व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by Dainik Maval दैनिक मावळ (@dainikmaval)

‘ट्रामा केअर सेंटरमध्ये होणाऱ्या गैरसोयीमुळे जर कुणाही प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला, तर त्याची पूर्ण जबाबदारी आयआरबी प्रशासनाची असेल’, असे मत शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख अभिजित गायकवाड यांनी व्यक्त केले. तसेच, ‘याबाबत योग्य ती पावले लवकरात लवकर उचलली नाही तर आयआरबीच्या कुठल्याही अधिकाऱ्याला ऑफिसमध्ये येऊन देणार नाही,’ असा इशारा यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला.

शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक नरेश काळवीट, जिल्हा सचिव योगेश गिरीश गोसावी, जिल्हा उपसचिव जावेद पठाण, महेश फाटक, तालुका संघटक रवी इंगळे, पराग राणे, युवराज, अक्षय देसाई, धनेश हुंडारे, काशिनाथ येवले तसेच वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –

– ब्रेकिंग! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढवली, वाचा मंत्रिमंडळ निर्णय
– मावळमधील पुसाने गावात क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान तुफान राडा, स्टम्प-बॅटने मारहाण
– खळबळजनक! किरकोळ घरगुती वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, कामशेत येथील धक्कादायक घटना


Previous Post

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढवली, वाचा मंत्रिमंडळ निर्णय

Next Post

मोठी बातमी! तळेगाव दाभाडेजवळील घोराडेश्वर इथे दीडशे फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Youth Died After Falling Into Valley

मोठी बातमी! तळेगाव दाभाडेजवळील घोराडेश्वर इथे दीडशे फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.