पुण्यातील कसबा, शहरातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. मावळचे माजी आमदार आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याही नावाचा समावेश या यादीत आहे. ( BJP Announced Names Of 40 Star Campaigners For Kasba And Chinchwad Assembly Constituencies By-Elections Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीकरिता दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना स्टार प्रचारक यांची यादी पाठवली आहे. ती यादी खालीलप्रमाणे;
1. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,
2. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
3. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,
4. केंद्रीय मंत्री नारायण राणे,
5. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,
6. केंद्रीय मंत्री भागवत कराड,
7. राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,
8. पुणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,
9. निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ,
10. खासदार उदयनराजे भोसले,
11. खासदार गिरीष बापट,
12. खासदार धनंजय महाडिक,
13. मंत्री सुधीर मुनगंटीवार,
14. माजी मंत्री विनोद तावडे,
15. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,
16. ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर,
17. आमदार प्रवीण दरेकर,
18. आशिष शेलार,
19. श्रीकांत भारतीय,
20. रविंद्र चव्हाण,
21. सुनील कर्जतकर,
22. राहुल कुल,
23. गोपीचंद पडळकर,
24. माजी मंत्री बाळा भेगडे,
25. विजय देशमुख,
26. आमदार माधुरी मिसाळ,
27. विक्रांत पाटील,
28. विजय चौधरी,
29. जगदीश मुळीक,
30. राजेश पांडे,
31. सुधाकर भालेराव,
32. वासुदेव काळे,
33. इजाझ देशमुख,
34. संदीप भंडारी,
35. प्रकाश जावडेकर,
36. दिलीप कांबळे,
37. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे,
38. हर्षवर्धन पाटील,
39. उमा खापरे,
40. अमर साबळे
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके बनले राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक, पोटनिवडणूकीसाठी पक्षाकडून 20 नावे जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– शिळींब गावात भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन; अनिकेत घुलेंकडून कार्यक्रमासाठी शिवरायांची आकर्षक मूर्ती भेट
– बंद दाराचे कुलूप तोडून चोरी, किवळे-देहूरोड येथील घरफोडीत सोने-चांदीचे दागिने लंपास