व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारची मंजूरी, शिंदे-फडणवीस सरकारला मोठे यश

महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 24, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश, मावळकट्टा
Sambhajinagar

File Image - Sambhajinagar


महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यास केंद्राची अनुमती असल्याचे म्हटले होते. तसेच, आता औरंगाबाद शहराचेही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे मोठे यश म्हणावे लागेल. ( central govt approves renaming aurangabad city as chhatrapati sambhajinagar and osmanabad city as dharashiv )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…! pic.twitter.com/IfXbdFec7r

— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) February 24, 2023

केंद्र सरकारच्या या निर्णयाची प्रत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. तसेच,

“औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!”

असेही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नामांतराचा संपूर्ण घटनाक्रम…

औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहर नामांतराचा मुद्दा महाराष्ट्रात मागील 50 वर्षांहून चर्चेत आहे. सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा जाहीर सभेत केला होता. त्यानंतर नामांतराची ही मागणी समोर आली. यासह उस्मानाबादचेही धाराशिव करण्याची मागणी पुढे आली. नामांतराचा हा मुद्दा त्यानंतर मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत कळीचा बनला. शिवसेनेसाठी तर तो प्रमुख अजेंडा राहिला.

त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये दोन्ही शहराच्या नामांतराचा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला. मात्र, त्यानंतर ठाकरेंचे सरकार पडले आणि सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा निर्णय पुन्हा घेतला. यावेळी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे करण्याचा निर्णय झाला.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी…

■ औरंगाबादचे #छत्रपती_संभाजीनगर.

■ उस्मानाबादचे #धाराशिव…

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह यांचे मनःपूर्वक आभार…#ChhatrapatiSambhajinagar #Dharashiv@narendramodi @AmitShah pic.twitter.com/AUjxriw3eh

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 24, 2023

 

दिनांक 16 जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली. त्यानंतर आज (24 फेब्रुवारी 2023) केंद्र सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करणे याला मंजुरी दिली.

अधिक वाचा –

– कुसवली गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती; शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांनी घेतला विविध योजनांचा लाभ
– मोठी बातमी! माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन


dainik maval jahirat

Previous Post

गाडी पार्क करण्यावरुन वाद, तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

फुफ्फुसात दुर्मिळ गाठ असणाऱ्या तरुणावर यशस्वी उपचार; तळेगावमधील टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये शस्त्रक्रिया

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dr-Jaipal-Reddy

फुफ्फुसात दुर्मिळ गाठ असणाऱ्या तरुणावर यशस्वी उपचार; तळेगावमधील टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.