तळेगाव दाभाडे नगरपरिषद, टी.जी.एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यामाने महिलांमध्ये कर्करोग जनजागृती करण्यासाठी ‘फाईट अगेंस्ट कॅन्सर: रोटरी सिटी पिंकेथॉन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 7 वाजता तळेगाव दाभाडे इथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रॅलीला प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर उपस्थित होता. योग्यवेळी उपचार घेतल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊन कर्करोगमुक्त सुखी जीवन जगता येते, असा संदेश मॅरेथॉन वेळी देण्यात आला. ( Women Spontaneous Response To Pinkathon Rally Organized For Cancer Awareness Inauguration Of Marathon By Marathi Actor Siddharth Chandekar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महिलांमध्ये कर्करोगाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद, टी.जी.एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी सिटी यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या या पिंकेथॉनचे उद्घाटन अभिनेते सिद्धार्थ चांदेकर यांच्या हस्ते झाले. ही मॅरेथॉन दौड मारुती चौक ते टी जी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर पर्यंत तीन किलोमीटर एवढी होती. यात सहभागींना टी-शर्ट तसेच मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्यांना पदके देऊन गौरवण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये कर्करोगासंबंधीत माहिती पत्रके वाटण्यात आली, तसेच जनजागृती करणारी फलके लावण्यात आली होती.
स्त्रियांमध्ये होणारे, स्तन, गर्भाशय आणि गर्भाशयाच्या मुख्याच्या कर्करोगाबाबत टी.जी.एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या डॉ. शिल्पी डोळस यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरने अल्प दरात उपलब्ध करून दिलेल्या तपासणी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले.
हेही वाचा – बालपण समृद्ध करणारी, चिऊताई…! तुझ्यासाठी दोन ओळी । World Sparrow Day
या कार्यक्रमावेळी, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी अध्यक्ष दिपक फल्ले टी.जी.एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ मनोज तेजानी तसेच प्रकल्प प्रमुख डॉ धनश्री काळे, सहप्रकल्प प्रमुख सुनंदा वाघमारे, पिंकेथॉनचे समन्वयक डॉ विद्या पोतले, टी.जी.एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे संचालिका ब्रेस्टऑन्को सर्जन डॉ शिल्पी डोळस, डायरेक्टर सीएसआर अँड प्रिवेंटिव्ह हेल्थ डॉ नेहा कुलकर्णी, संचालक सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ जयपाल रेड्डी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला अल्टा कंपनीकडून मोठी मदत; वॉटर रेस्क्यू ऑपरेशन होणार अधिक जलद
– आमदार साहेब, इकडे लक्ष कधी देणार? कदमवाडी ते लंकेवाडीपर्यंतचा रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर, लाखोंचा फंड कचऱ्यात जाणार?