लोणावळा येथील भांगरवाडी रेल्वे गेट क्र. 32 आज सोमवार (27 मार्च) सकाळी 8 वाजल्यापासून बुधवारी (29 मार्च) रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. भांगरवाडी रेल्वे गेट मध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजुने रस्ता खचला आहे. तसेच गेटच्या बाहेर दोन्ही बाजुला खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्याच्या कामासाठी गेट बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती या कामाचे ठेकेदार अशूतोष सिंग यांनी दिली. ( Lonavala News Bhangarwadi Railway Gate Will Be Closed For Next Three Days For Road Repair )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भांगरवाडी रेल्वे गेट मधून प्रवास करताना ट्रॅकच्या बाजुने रस्ता खचलेल्या भागातून वाहने घेऊन जाताना नागरिकांना त्रास होत होता. याकरिता सदरचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. संपुर्ण रस्ता खोदून तो नव्याने बनविण्यात येणार आहे. या कामासाठी व काम झाल्यानंतर डांबर सेट होण्यासाठी वेळ लागणार असल्याने तीन दिवस हा गेट बंद ठेवत काम केले जाणार आहे. नांगरगाव बाजुला गेटच्या बाहेर रस्त्यावर असलेला खोलगटपणा देखील काढत त्याठिकाणी पाणी साचणार नाही, अशा पद्धतीने काम केले जाईल असे सिंग यांनी सांगितले.
सदर रेल्वे गेट तीन दिवस बंद राहणार असल्याचे सूचना फलक रेल्वे प्रशासनाकडून गेटच्या दुतर्फा लावण्यात आले असले तरी नागरिकांपर्यंत ही माहिती न पोहचल्याने गेटवर जाऊन नागरिक परत माघारी फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. भांगरवाडी रेल्वे गेट बंद राहणार असल्याने गवळीवाडा नाका, कुमार चौक भागात वाहनांची संख्या वाढणार आहे. तसेच बाजार भागात भुयारी गटर योजनेचे काम सुरु असल्याने शहरात देखील वाहतूककोंडी वाढण्याची शक्यता आहे. ( Lonavala News Bhangarwadi Railway Gate Will Be Closed For Next Three Days For Road Repair )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरात वारकरी बंधू भगिनींसाठी मोफत शुगर टेस्टिंग शिबिर, 62 नागरिकांनी घेतला लाभ
– किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाची दुचाकी चालक तरुणाला जमाव करुन बेदम मारहाण
– सावधान! देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, सलग दुसऱ्या दिवशी ‘इतक्या’ रुग्णांची नोंद, सक्रीय रुग्णांचा आकडा 10 हजार पार