कॉन्ट्रॅक्टच्या आपसी वादातून एका कंपनीच्या बांधकाम साईटवर जात तेथील क्रेन सर्विस देणाऱ्या व्यावसायिकाला आणि कामगारांना लाकडी दांडक्याने मारहाण करत धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दी घडली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रकरणी फिर्यादी अनिल मारुती नरवडे (वय ४० वर्षे, धंदा क्रेन सर्विव्हीस, रा. नवलाख उंबरे ता मावळ जि पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ३४१, ३३७, १४३, १४४, १४८, १४९, ३२३, ५०४ महाराष्ट्र पालीस अधिनियम ३७१,१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २९ मार्च २०२३ रोजी दुपारी दोनच्या सुमारास मौजे मिंडेवाडी, नवलाख उंब्रे ता मावळ जि पुणे इथे बोनफिगलोली बिटी पी.एल. या कंपनीच्या बांधकाम साईटवर हा प्रकार घडला. ( Beating At Companys Construction Site Over Contract Dispute Case Registered In Talegaon MIDC Police )
तक्रारीनुसार,
१) बळीराम मराठे (रा. मिंडेवाडीता मावळ जि पुणे)
२) हेमंत शेळके (रा. तळेगाव ता मावळ जि पुणे)
३) शाम शेळके (रा. तळेगाव ता मावळ जि पुणे)
४ विजय लांडे (रा. तळेगाव ता मावळ जि पुणेः
आणि इतर ३ ते ४ लोक (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद केलेल्या तारखेला, वेळी आणि ठिकाणी आरोपी यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कंपनीमधील क्रेनच्या कॉन्ट्रक्टच्या आपसातील वादावरून फिर्यादी आणि त्याच्या कामगारांना काम करण्यापासून रोखले. तसेच शिवीगाळ दमदाटी करून हातात लाकडी दांडके आणि दगड घेऊन फिर्यादी व साक्षीदारांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच दगड फेकून मारून धक्का बुक्की केली, असे फिर्यादीत नमुद आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलिस उप निरीक्षक वालकोळी हे या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहे.
अधिक वाचा –
– तळेगावात कोयता गँगची दहशत; ‘मोबाईलचे हप्ते भरणार नाही, काय करायचे ते कर’ म्हणत एकावर जीवघेणा हल्ला, 3 आरोपी अटकेत
– तळेगाव दाभाडे आणि कामशेत भागातून मोक्कातील 7 अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश