व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकन्यायालयात जुळले वर्षानुवर्षे दुभंगलेले चार संसार । Pune News

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने रविवारी (दिनांक 2 मार्च) विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 5, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Lok-Adalat

File Image


(पुणे) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने रविवारी (दिनांक 2 मार्च) विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत कौटुंबिक वाद प्रकरणांच्या अनुषंगाने प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय क्रमांक सात पुणे यांच्या पॅनेलसमोर ठेवण्यात आलेल्यांपैकी 18 प्रलंबित प्रकरणे मध्यस्थीने निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये वर्षानुवर्षे दुभंगलेले 4 संसार पुन्हा जोडले गेले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाने व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे एस. सी. चांडक आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती मंगल कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील पक्षकारांनी व त्यांचे विधीज्ञ यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून तर काही पक्षकार व विधीज्ञ यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावून आपले म्हणणे मांडले. त्यामध्ये महिला पक्षकारांची उपस्थिती लक्षणीय होती. ( Pune Lok Adalat News 4 Separated Couples Reunite )

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक सात सुधीर जी. बरडे यांच्या विशेष मध्यस्थीने सात वर्षापासून दुभंगलेले संसार जुळले व मुलाबाळांपासून विभक्त राहत असलेले एकूण चार जोडपे एकत्र येऊन न्यायालयातूनच नांदावयास गेले. उर्वरित इतर कौटुंबिक प्रकरणात एक रकमी कायमस्वरूपी पोटगीची रक्कम देऊन तडजोड करण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणामधील पक्षकारांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व त्यांनी लोकन्यायालयाचे आभार मानले.

हेही वाचा – जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती, चालू आर्थिक वर्षात 100 टक्के खर्च

लोकन्यायालयात संसार जुळवून नांदावयास गेलेल्या कुटुंबीय व त्यांच्या अपत्यांना पॅनल प्रमुख सुधीर बरडे, पॅनल सदस्य ॲड. साळुंखे व सहायक अधीक्षक श्रीमती रीता क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. विशेष लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी सर्व विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.

अधिक वाचा –
– मावळात राष्ट्रवादीला झटका; साळुंब्रे पाठोपाठ शिवली सोसायटीवरही भारतीय जनता पार्टीचा झेंडा
– मोठी बातमी : शिरगाव सरपंच हत्या प्रकरण, पोलिसांना तपासात मोठे यश, प्रमुख हल्लेखोर आरोपींना सिनेस्टाईल अटक


dainik maval jahirat

Previous Post

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती, चालू आर्थिक वर्षात 100 टक्के खर्च

Next Post

व्हिडिओ : बळीराजामुळे वाचले कासवाचे प्राण, वन्यजीव रक्षक मावळच्या प्राणीमित्राची तत्काळ मदत । तळेगाव दाभाडे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Turtle-Life-Save-Video

व्हिडिओ : बळीराजामुळे वाचले कासवाचे प्राण, वन्यजीव रक्षक मावळच्या प्राणीमित्राची तत्काळ मदत । तळेगाव दाभाडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 5, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.