मागील अनेक दिवसांपासून अजित पवारांबाबत सुरु असलेल्या विविध चर्चांना अखेर अजित पवार यांनीच पुर्णविराम दिला आहे. मुंबईत आज पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांची भुमिका मांडली. आपण राष्ट्रवादीतच आहोत. कुणाच्याही सह्या घेतलेल्या नाहीत. माझ्याबद्दल होणाऱ्या चर्चांमध्ये तथ्य नाही, अशी स्पष्ट भुमिका अजित पवार यांनी मांडली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणाले अजित पवार?
- माझ्याबद्दल आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचे काम सुरु आहे.
- ज्या बातम्या समोर येत आहेत, त्या चुकीच्या आहेत.
- कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जात आहे.
– महाराष्ट्र भूषण पुरस्कार वेळी झालेल्या दुर्घटनेत मी उद्धव ठाकरेंसोबत रुग्णालयात गेलो.
– विरोधी पक्ष नेता म्हणून मी अनेक ठिकाणी भेट देत होतो.
– महाराष्ट्र भूषण पुरस्कार संध्याकाळी घेता आला असता.
– सरकारचा निष्काळजीपणा महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावेळी दिसून आला.
– पाच लाख रुपये देऊन काहीही होणार नाही, कुटुंबीयांचं सांत्वन त्याने होणार नाही
– महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या मागून राजकारण करण्याचा प्रयत्न होता का?
– आप्पासाहेबांबद्दल आम्हाला आदरच.
– त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याचं काम राज्यकर्त्यांनी केले.
- माझ्या बद्दल ज्या चर्चा होतात, त्यात यत्किंचितही सत्यता नाही.
- चाळीस आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत.
- आम्ही सर्वजण राष्ट्रवादीच राहणार.
- माझ्या जवळ आज आलेले आमदार त्यांच्या कामांसाठी आले होते.
- कार्यकर्त्यांनी काळजी करु नये. संभ्रम बाळगू नये.
- ज्या बातम्या पसरवल्या जातायेत, त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जातायेत.
- राज्यात जे महत्वाचे प्रश्न आहेत, त्या पासून लक्ष हटवण्यासाठी या गोष्टी होत आहेत.
- सभांमध्ये कुणी बोलायचं, हे आम्हीच ठरवतोय.
- माझ्या सोशल मीडियाबाबत ध चा म करु नये.
- विघ्नसंतोषी लोकं आमच्या बाबत वावड्या उठवत असतील.
– आमचं वकीलपत्र कुणी घेण्याचं कारण नाही
– मुखपत्रात कोट करुन लिहिण्याचं काम नाही
– तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्याचीच भुमिका मांडावी
अधिक वाचा –
– ‘अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी’ – आमदार सुनिल शेळके
– मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गेलेल्या 11 श्रीसदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर